शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

‘कॅन्सर’चा आजार, त्यात सराफ दागिने घेऊन पसार, अंगणवाडी मदतनीस महिलेला पोलिसांचे ‘हॅप्पी न्यू ईअर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 09:06 IST

Mumbai : पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात.

- गौरी टेबकर- कलगुटकर

मुंबई: ‘‘मी ब्रेस्ट कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने माझे दागिने गहाण ठेवले. जे व्याजासह त्याला परतही केले.  ते पैसे आणि माझे दागिने घेऊन सराफ पसार झाला. चार वर्षांनी ते मला परत मिळाले आहेत, ज्याची आशाच सोडली होती. पोलिसांनी खऱ्या अर्थाने माझे न्यू इयर हॅप्पी केले आहे. मी त्यांची आभारी आहे’’, अशी प्रतिक्रिया अंगणवाडी मदतनीस अरुणा पाल यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 

पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात. त्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे कळले. त्यामुळे तातडीने उपचार करणे गरजेचे होते. मुलगा लहान असल्याने आपल्या मागे त्याचे काय होणार?, या चिंतेने त्यांनी पैशांची सोय करण्यासाठी ओळखीच्या सराफाकडे दागिने गहाण ठेवले. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

सराफाचे पैसे त्यांनी परत केले. तो दागिने घेऊन पसार झाला. याप्रकरणी त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.  कॉन्स्टेबल विजय पांचाळ यांनी चांगले सहकार्य करत मार्गदर्शन केले. मात्र तरी दागिने परत मिळतील अशी आशा नव्हती. पण, थर्टी फर्स्टच्या दिवशी हे दागिने परत मिळाल्याने नवीन वर्षाचे स्वागत मी ते घालूनच करेन असे त्या म्हणाल्या. तर, इस्टेट एजंट श्रेणील शाह यांच्या २० जुलै, २०२१ रोजी चोरीला गेलेल्या ॲक्टिव्हाची चावी त्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

‘पाच लाख गमावले आणि दहा हजार मिळाले’दहिसरच्या घरटन पाड्यामध्ये राहणारे पुंडलिक सरोदे कुटुंबीय १० फेब्रुवारी, २०१९ मध्ये कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी चोरांनी १४ ते १७ तोळे सोने, ८० हजार रोख मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सतत पाठपुरावा केल्यावर १० हजारांची रोकड आणि कॅमेरा आम्हाला शुक्रवारी परत देण्यात येतोय. तसेच दीड तोळे सोने हस्तगत केल्याचे समजले. मात्र त्यासाठीदेखील कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या. ज्यात नवऱ्याचा किती तरी दिवसांचा पगार बुडाला आणि रिक्षाला खर्च किती केले त्याचा काही हिशेबच नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Goldसोनं