शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१४० कोटींची बनावट बिले देणाऱ्या कंपनीच्या मालकांना घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:25 IST

मुंबईत सीजीएसटी विभागाच्या एकाच दिवसात दाेन कारवाया

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीजीएसटी विभागाकडून कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असून, गेल्या २४ तासांत सीजीएसटीच्या मुंबईच्या पश्चिम आणि मध्य आयुक्तालयाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत १४० कोटींची बनावट बिले देणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये, २५ कोटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) उघडकीस आली आहे.

सीजीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई  पश्चिम क्षेत्राने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट टोळीच्या फसवणुकीचे प्रकार उघड करत वर्सोवा येथील एका कंपनीच्या मालकाला अटक केली. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  कारवाई करताना, लोहयुक्त धातू (फेरस मेटल) आणि भंगाराचा व्यापार करणाऱ्या मेसर्स एनईसीआयएल  मेटल डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. चौकशीत, मालाची खरेदी-विक्री किंवा पुरवठा न करता १० कोटी रुपयांची जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) फसवणूक केल्याचे दिसून आले. यामध्ये, कर फसवणुकीसाठी सुमारे ६० कोटींची बनावट बिले जारी करण्यात आली होती. या कंपनीच्या एका संचालकाला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र दुसरा संचालक फरार असल्याने त्याचा शोध सुरू होता. अखेर ११ मे रोजी त्याला शोधण्यात यंत्रणेला यश आले.  संचालकांकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.  

४६५ काेटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटमुंबई पश्चिम आयुक्तालयाने ४६५ कोटी रुपयांची बनावट  इनपुट टॅक्स क्रेडिट उघडकीस आणले आहे. ३५ कोटी रुपये वसूल केले असून गेल्या सहा महिन्यांत  करचोरी करणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले आहे. त्यापाठोपाठ सीजीएसटीच्या मुंबई मध्य अधिकाऱ्यांनी ८३ कोटींच्या बनावट बिलासह १५ कोटींची बनावट आयटीसी रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी आशिक स्टील इंडस्ट्रीच्या मालकाला बेड्या ठोकल्या असून, २४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :GSTजीएसटी