शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सत्कारानंतर हाती पडल्या बेड्या; तरुणीची मदत करणारा निघाला मोबाइल चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:37 IST

Crime News Aurangabad, Mobile Theft वाळूज एमआयडीसीत आठवडाभरापूर्वी एका लघु उद्योजकांचा महागडा मोबाईल चोरट्याने खिशात हात घालून पळविला होता.

ठळक मुद्देलांबविलेला मोबाईल आरोपीने बंदच ठेवल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता.प्रियकराने वाऱ्यावर सोडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची केली होती मदत

वाळूज महानगर :  प्रियकराने वाऱ्यावर सोडल्यानंतर परप्रांतीय तरुणीला सुखरूपपणे पोलिसांच्या स्वाधीन करणारा उद्योगनगरीतीस रिक्षाचालक चक्क मोबाइल चोरटा निघाल्यामुळे पोलीसही अवाक झाले. चांगले काम केल्यानंतर सत्कार करणाऱ्या पोलिसांनी गुन्ह्यात सापडल्यानंतर त्यास बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी सांगितले की, वाळूज एमआयडीसीत आठवडाभरापूर्वी विश्वास वंजारे या लघु उद्योजकांचा महागडा मोबाईल चोरट्याने खिशात हात घालून पळविला होता. वंजारे यांनी त्या चोरट्याचा पाठलागही केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा  शोध घेण्यास सुरवात केली. लांबविलेला मोबाईल आरोपीने बंदच ठेवल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता.  पोलिसांनी  बातमीदाराच्या मदतीने संशयित अशोक बबनराव पानखेडे (१९ रा.रांजणगाव) या अ‍ॅपेरिक्षा चालकास शनिवारी (दि.५) ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने विश्वास वंजारे यांचा २७ हजाराचा मोबाईल लांबविल्याची कबुली देत  मोबाईल पोलिसांना काढून दिला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन ओगले, पोहेकॉ. विजय होनवडतकर, कय्युम पठाण, पोना फकीरचंद फडे, पोकॉ. प्रदिप कुटे यांनी पार पाडली.

मी तुम्हाला मदत केलीय...

विशेष म्हणजे मोबाइल लांबविणाऱ्या रिक्षाचालक अशोक पानखेडे याने दोन महिन्यांपूर्वीच प्रियकराने वाऱ्यावर सोडलेल्या एका परप्रांतीय तरुणीस मदत करीत एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्याचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करीत शाबासकी दिली होती. आता चोरीत पकडला गेल्यानंतर त्याने मी पूर्वी पोलिसांची मदत केली, आता मला सोडा असा गयावया करू लागला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद