शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टपरीत अमली पदार्थ विकणाऱ्याची माहिती देणाऱ्या तरुणाचा माेडला हात, विक्रेत्याचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 02:33 IST

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे.

नालासोपारा : माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तक्रारदारास पिटाळून लावल्याची घटना घडली आहे.वसईच्या प्रेमनगर चाळीतील एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका टपरीत जनरल स्टोअर्सच्या नावाखाली  असगर अली अहमद अन्सारी उर्फ राजू हा गावठी, विदेशी दारू, बीयर यांची बेकायदा विनापरवाना विक्री करतो. या गैरकृत्याविरोधात मोहम्मद अली अहमद अन्सारी या तरुणाने माणिकपूर पोलिसांना माहिती देऊन कारवाईची मागणी केली होती. बेकायदा दारूविक्रीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाला होता. ६ मार्चला याबाबतचा व्हिडीओसह माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना सादर केली होती. तरीही पोलिसांनी योग्य कारवाई न करता आरोपीविरोधात अमली पदार्थ विक्री करत असल्याचा गुन्हा दाखल न करता गांजा सेवन करत असल्याचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी कारवाई न करता आरोपीबरोबर आर्थिक तडजोड केल्याचा आरोप तक्रारदाराने नव्याने केलेल्या तक्रार निवेदनात केला आहे. २४ मार्चला रात्री ११ वाजता असगरअली हा गांजाविक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतच्या पुराव्यासाठी मोबाइलवर शूटिंग करीत असताना आरोपीने जमीला अहमद अन्सारी, अली अहमद अन्सारी यांच्यासह तरुणाला जबर मारहाण केली. यात त्याचा डावा खांदा, हाताला दुखापत झाली आहे. मात्र माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. त्यात फक्त असगरअली याचेच नाव नमूद असून गांजा विक्रीबाबत कुठलाच उल्लेख केलेला नाही. दरम्यान, याबाबतचे व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग पुरावे म्हणून पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत.  सहायक पोलीस आयुक्त गिरिधर यांना १० दिवसांत चाैकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. माणिकपूर पोलीस तडजोड करत असल्याने त्याच्यावर कारवाई हाेत नसल्याचे मारहाण झालेल्या मोहम्मद अन्सारी याचे म्हणणे आहे.  यावर पाेलीस आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी