शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीच गाठावे लागले पोलिस ठाणे; नवरी निघाली ठग, दागिन्यांसह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:22 IST

ऑनलाइन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच, आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्न जुळवून साखरपुड्याची तयारी केली. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच होणारी नवरी साखरपुड्यासाठी घेतलेले दागिने आणि पैसे घेऊन पसार झाल्याने  तरुणाला पोलिस वारी करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी खंडणी, तसेच फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

आयटी इंजिनीअर असलेला तरुण कांदिवली परिसरात कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. शादी डॉट.कॉम या बेबसाइटवरून त्याची सुप्रिया सिंगसोबत ओळख झाली. संवाद वाढला. त्यानंतर, सुप्रियाने कुटुंबीयांसोबत जवळीक वाढविली. लग्नही ठरले. साखरपुडा करण्याचा बनाव करत, तरुणी सोन्याचे दागिने, मोबाइल फोन व कपडे, पैसे असे एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज बळकावून नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुणाला धक्का बसला. अखेर १२ तारखेला चारकोप पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी सुप्रियासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे तरुण मानसिक धक्क्यात आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस अधिक तपास करत आहेत. 

सतर्क रहा!ऑनलाइन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका. पैशाची मागणी होताच, वेळीच सतर्क होत, संवाद थांबवा. कुणावर संशय असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणेला कंटाळून, तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी, म्हणून वयाच्या ७० वर्षी एका आजोबांनी पुन:श्च हरिओम करण्याचे ठरविले. आयुष्यावर आलेले एकटेपणाच्या लॉकडाऊनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळविले,  परंतु लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला.

टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजी