शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन वीकमध्ये झालेला प्रेमविवाह अन् आता...; प्यारवाली लव्हस्टोरीचा 'असा' भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 10:58 IST

व्हॅलेंटाईन वीकमध्ये झालेल्या या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनमच्या कुटुंबात कोणीच नव्हते, त्यामुळे तिने अवधेशसोबत प्रेमविवाह केला.

ग्वाल्हेरमध्ये व्हॅलेंटाईन वीकमध्ये पत्नीवर असलेल्या रागातून एका तरुणाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बहोदापूर पोलीस ठाण्यातील किशन बाग परिसरात अवधेश वंशकार याने पत्नी सोनमची निर्घृण हत्या केली. कुटुंबीयांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी अवधेशने सोनमला एका मुलाशी Whatsapp वर बोलताना पकडले होते. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. 9 फेब्रुवारीच्या रात्री हे प्रकरण इतके वाढले की अवधेशने पत्नी सोनमची धारदार शस्त्राने हत्या केली. 

अवधेशने सकाळी पोलीस ठाणे गाठून स्वत: गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खून केल्यानंतर आरोपी अवधेश थेट बहोदापूर पोलीस ठाण्यात गेला. त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला किशनबागेत नेले. तेथे पत्नी सोनमचा मृतदेह घरात पडून होता. महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. काठ्या आणि रॉडसोबतच अवधेशने धारदार शस्त्रांनी वार केले होते. बहोदापूर पोलिसांनी तत्काळ सोनमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जैरोग्य रुग्णालयात पाठवला. 

पोलिसांनी आरोपी पती अवधेशकडून तिचा मोबाईलही घेतला. जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ग्वाल्हेरच्या किशनबाग भागात राहणारा 35 वर्षीय अवधेश सोनमला 3 वर्षांपूर्वी ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर भेटला होता. व्हॅलेंटाईन वीकमध्ये झालेल्या या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनमच्या कुटुंबात कोणीच नव्हते, त्यामुळे तिने अवधेशसोबत प्रेमविवाह केला. दोघांचे आयुष्य चांगले चालले होते.

काही महिन्यांपूर्वी सोनमची झाशीतील एका मुलाशी ओळख झाली. अवधेशच्या आईने पोलिसांना सांगितले की, 3 दिवसांपूर्वी झाशीच्या मुलाने अवधेशच्या मोबाईलवर सोनमसोबतचे आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. पण, न पटल्याने अवधेश काल रात्री सोनमची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी