शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरात अडीच लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 22:31 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देदोघांना अटक, एक फरारगुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. विशाल प्रदीप परमार (रा. इतवारी मिरची बाजार) आणि मोहन शामलाल शाहू (रा. वनदेवीनगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून, त्यांचा सलीम नावाचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक शुक्रवारी रात्री इतवारी परिसरात गस्त करीत असताना त्यांना एक ऑटो दिसला. त्यात बसलेल्या आरोपींचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठी पोती भरून दिसली. परमार आणि शाहू या दोघांना पोलीस विचारपूस करीत असतानाच आरोपी सलीम तेथून पळून गेला. ऑटोमध्ये असलेल्या पोत्यात एमएलडी ३३ नामक गुटख्याचे ७२०० पॅकेट आढळले. त्याची किंमत दोन लाख ३७ हजार ६०० रुपये असून, ज्या ऑटोतून गुटख्याची वाहतूक केली जात होती तो एक लाख रुपयाचा ऑटो असा एकूण ३ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईसाठी त्यांनी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रफुल टोपले यांनाही बोलवून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक पंकज घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.खामल्यात दारू जप्तगुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने खामला येथील सिंधी कॉलनीत राहणारा आरोपी विजय डेंबवानी याच्या घरी छापा मारून त्याच्याकडून इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग डिलक्स अशा विदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोपी डेंबवानी परवाना नसताना अवैध दारू विक्री करीत होता. त्याच्याकडे दारू घेणाऱ्याची नेहमी गर्दी होत होती. डेंबवानी याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी ही कारवाई केली.

टॅग्स :raidधाडTobacco Banतंबाखू बंदी