शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर स्पामध्ये दररोज 10-15 जणांकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 15:10 IST

Gurugram Gang Rape : पीडितेने पोलिसांकडे न्याय मागितला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

गुरुग्राम : हरयाणातील (Haryana) गुरुग्राममधून  (Gurugram) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्पामध्ये (Spa ) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दररोज 10-15 जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पीडितेने पोलिसांकडे न्याय मागितला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी स्पा ऑपरेटरसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्पा ऑपरेटर आणि अन्य 3 जणांनी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी स्पा ऑपरेटर झुमा आणि त्याचे तीन साथीदार पूजा, रुबेल इक्बाल आणि सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडितेने आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी तिला धीर देत गुरुग्रामच्या सेक्टर-51 मधील महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावेळी हे भयानक प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला.

महिनाभर आधी गुरुग्राममधील एका मॉलमध्ये पीडित मुलगी आरोपी पूजाला भेटली होती. पूजाने तिला डॉक्टरांच्या दवाखान्यात नोकरी देऊ केली. पीडिता नोकरीच्या शोधात होती म्हणून तिने पूजाची ऑफर स्वीकारली. ती डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करू लागली, पण दोनच दिवसांत तिला काढून टाकण्यात आले. त्यानंतर, पूजाने पुन्हा पीडितेला आपल्या नातेवाईकाच्या गुरुग्रामच्या स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची ऑफर दिली, जो झुमा चालवत होता, असे पीडित मुलीने सांगितले.

पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, त्यादिवशी झुमाने एका व्यक्तीला बोलावले आणि पीडितेला खोलीत जाण्यास सांगितले. तिने विरोध केला असता चार आरोपींनी तिला घेरले. त्यानंतर झुमाने तिला सांगितले की, फक्त एक दिवस त्या माणसासोबत राहा आणि नंतर नोकरी सोड. त्यानंतर त्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच, नोकरी सोडल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू, अशी धमकी आरोपीने दिली. मी खूप घाबरले आणि पुढील 4-5 दिवस स्पामध्ये गेले. त्यावेळी अनेकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. दररोज माझ्यावर जवळपास 10-15  जणांनी बलात्कार केला, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी