शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 21:44 IST

गुलफाशाने, सोनमपेक्षाही एक पाऊल पुढे जात, लग्नाच्या एक दिवस आधीच आपल्या प्रियकरासोबत मिळून वराची हत्या केली.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्या प्रकरण देशभर हनीमूनसाठी गेलेल्या राजाची पत्नी सोनमने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली होती. आता अशीच एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रामपूरमधून समोर आली आहे, जिथे एका वधूने, गुलफाशाने, सोनमपेक्षाही एक पाऊल पुढे जात, चक्क लग्नाच्या एक दिवस आधीच आपल्या प्रियकरासोबत मिळून वराची हत्या केली. पोलिसांनी सोमवारी (१६ जून रोजी) वराचा मृतदेह ताब्यात घेतला असून, वधू गुलफाशा आणि तिच्या प्रियकरासह चार जणांविरुद्ध खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे, तर वधू आणि अन्य एक आरोपी अद्याप फरार आहेत.

नेमके काय घडले?

रामपूर जिल्ह्यातील गंज पोलीस स्टेशन परिसरातील निहाल (३५) हा लग्न आणि पार्ट्यांमध्ये जेवण बनवण्याचे काम करत असे. चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न भोट पोलीस स्टेशन परिसरातील धनुपुरा गावातील गुलफाशासोबत निश्चित झाले होते. लग्नाची वरात १५ जून रोजी येणार होती आणि निहालच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती.

एका फोन कॉलने बदलले नशीब

दरम्यान, १४ जून रोजी निहालला एका तरुणाचा फोन आला. या तरुणाने स्वतःची ओळख नवरीचा चुलत भाऊ अशी करून दिली आणि नवीन कपड्यांसाठी माप घेण्यासाठी त्याला बोलावले. निहाल घराबाहेर पडला आणि दुचाकीवरून आलेल्या त्या दोन तरुणांसोबत निघून गेला.

संध्याकाळी उशिरापर्यंत निहाल घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. खूप शोध घेऊनही काहीही न सापडल्याने, कुटुंबीयांनी गंज पोलीस ठाण्यात निहाल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेत त्याची होणारी पत्नी गुलफाशा आणि तिचा प्रियकर सामील असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि कबुलीजबाब

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुणांची ओळख पटली. पोलिसांनी प्रियकर सद्दाम आणि फरमान यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी निहालची हत्या केल्याची कबुली दिली.

सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीवरून, अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील रतनपुरा जंगलातून निहालचा मृतदेह सापडला. निहालचा भाऊ नायब शाह याच्या तक्रारीवरून, गुलफाशा, प्रियकर सद्दाम, फरमान आणि अनीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रियकर सद्दाम आणि फरमान यांना अटक केली आहे, तर गुलफाशा आणि अनीस अजूनही फरार आहेत.

प्रेमसंबंधातून हत्या

एएसपी अतुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, निहालच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, सद्दाम, फरमान, अनीस आणि होणारी वधू गुलफाशा यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, निहालचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह जंगलातील मक्याच्या शेतात लपवण्यात आला होता. त्याचा मोबाईलही तोडण्यात आला होता.

रामपूरचे एसपी विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, वधू गुलफाशा हिची चौकशी केली जात आहे आणि फरार सद्दामचाही शोध घेतला जात आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू गुलफाशा हिचे तिच्या शेजारी राहणाऱ्या सद्दामसोबत (३२) एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. गुलफाशाचे लग्न निश्चित झाल्याने सद्दाम संतापला होता. तो गुलफाशाच्या घरी गेला होता आणि तिथे त्यांच्यात वादही झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमप्रकरणातून घडलेल्या या क्रूर हत्येने अनेकांना धक्का बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार