शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसोबत खोटं बोलून दुसरीशीच करत होता लग्न, नवरदेव मंडपाऐवजी रेपच्या आरोपात पोहोचला तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:22 IST

Groom Arrested before marriage : आरोपी राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचा राहणारा आहे. तो बॅंकेत इन्शुरन्सचं काम करतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore Crime News) पोलिसांनी एका नवरदेवाला अटक केली आहे. बॅंकमध्ये सोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. लग्नाचं आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यानंतर तो गपचूपपणे दुसऱ्या एका तरूणीसोबत लग्न करत होता. जशी याची माहिती तरूणीला मिळाली तिने पोलिसात तक्रार दिली आणि वरात निघण्याआधीच नवरदेवाला रेपच्या आरोपात अटक करण्यात आली.

आरोपी राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचा राहणारा आहे. तो बॅंकेत इन्शुरन्सचं काम करतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं. प्रेयसीला जेव्हा समजलं की, तिचा प्रियकर लपवून लग्न करत आहे तर ती लगेच सांरगपूरला गेली आणि पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी इंदुरमध्ये तक्रार द्यावी लागेल. ती लगेच इंदुरला परतली आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच कारवाई करत सांगरपूरला एक टीम पाठवली आणि नवरदेवाला अटक केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरदेवाची वरात बुधवारी सारंगपूरच्या खिचलीपूरला जाणार होती. पण मंगळवारी रात्रीच त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीवर रेपचा गुन्हा दाखल केला. घोडीवर बसण्याआधीच नवरदेव तुरूंगात गेला.विजय नगर प्रभारी तहजीब काजी यांच्यानुसार, रात्री उशीरा एक तरूणी आली होती आणि ती चिंतेत दिसत होती. तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिचं एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं आणि त्याने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. तरूणीने सांगितलं की, आरोपी बऱ्याच महिन्यांपासून लग्नाच्या नावावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता.

दोन दिवसांआधी तो इंदुरमध्ये तरूणीला घरी जात असल्याचं सांगून गेला होता आणि परत आल्यावर लग्न करू असं म्हणाला होता. यादरम्यान तरूणीला समजलं की, बुधवारी तिच्या प्रियकराचं लग्न होणार आहे. ज्यानंतर ती लगेच सारंगपूरला पोहोचली. त्यानंतर पुन्हा इंदुरला येऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ