शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 18:49 IST

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नंदिनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका तरुणाने आजीचा त्रिशूळाने वार करून जीव घेतला.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नंदिनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका तरुणाने आजीचा त्रिशूळाने वार करून जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्याने जवळच्या शिवमंदिरात जाऊन आजीच्या रक्ताने अभिषेक केला. येथे त्याने 'श्री शिवाय नमस्तुभ्यं' असंही लिहिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःलाही त्रिशूळाने दुखापत करून घेतली आहे. यामध्ये तो जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी नातू गुलशनला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. सध्या त्यांच्यावर एम्स रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत माहिती देताना नंदिनी पोलीस स्टेशनचे अधिकारी मनीष शर्मा यांनी सांगितलं की, दुर्ग जिल्ह्यातील नंदिनी पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात पुजारी म्हणून काम करणारा गुलशन गोस्वामी हा आजी रुक्मणी गोस्वामी यांच्यासोबत राहतो. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास गुलशनने ७० वर्षीय आजीवर त्रिशूळ हल्ला केला.

या हल्ल्यात आजीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या खाली पडल्या. यानंतर नातू गुलशन याने आजी रुक्मणीचं रक्त गोळा केलं आणि जवळच्या शिवमंदिरात जाऊन अभिषेक केला. त्याने शिवलिंगाभोवती रक्त टाकलं आणि हाताने त्यावर 'श्री शिवाय नमस्तुभ्यं' लिहिलं. या तरुणाने मंदिरातूनच त्रिशूळ नेल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड