शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अमली पदार्थाच्या व्यवसायात गोवेकरांचे प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 18:52 IST

गेल्या वर्षी याच प्रमाणात पोलिसांकडून २२१ गुन्हे नोंद करण्यात आले होते.

ठळक मुद्दे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी त्यात सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.पुर्वी किनारी किंवा शहरी भागा पुरता मर्यादित असलेला हा ड्रग्सचा व्यवसाय आता गावा गावातही पोहोचला आहे.मागील काही महिन्यापासून पोलिसांच्यावतीने या व्यवसायात गुंतलेल्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

म्हापसा - राज्यातील अमली पदार्थाच्याव्यवसायावर विदेशींचे खास करून नायजेरियन नागरिकांचे वर्चस्व असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात यात गुंतलेल्या गोवेकरांचे प्रमाण जास्त असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी त्यात सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुर्वी किनारी किंवा शहरी भागा पुरता मर्यादित असलेला हा ड्रग्सचा व्यवसाय आता गावा गावातही पोहोचला आहे. त्यामुळे गावातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. या वर्षी पहिल्या ९ महिन्यांत पोलिसांकडूनअमली पदार्थ विरोधी गुन्ह्याखाली सुमारे १६६ गुन्ह्यांची नोंद केली आहे. नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांत १८२ संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील ६५ गोवेकर असून ८१ इतर राज्यातील तर फक्त ३६ विदेशी नागरिकांचा त्यात समावेश होतो. एकूण अटक करण्यात आलेल्यात गोवकरांचे प्रमाण ३० टक्क्यांहून जास्त म्हणजे ३६ टक्के आहे. या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत अटक करण्यात आलेल्या गोवेकरांचे प्रमाण फक्त २३ टक्के होते; पण त्यानंतर मात्र मागील चार महिन्यांत त्यात बरीच वाढ झाली होती. अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकात १७ नायजेरियन, १५ रशियन, ३ केनिया देशातील तर प्रत्येकी १ इटली व नेपाळ देशातील आहेत.

गेल्या वर्षी याच प्रमाणात पोलिसांकडून २२१ गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यात २३३ जणांना अटक झाली होती. यातील गोवेकरांचे प्रमाण फक्त २७ टक्के होते. एकंदरीत ६३ गोवेकरांवर, १२० देशातील अन्य राज्यांतल्या नागरिकावर तर फक्त ४९ विदेशी नागरिकांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले.या वर्षी नोंद केलेल्या विविध  गुन्ह्यांत ४९ किलोग्रामचा १ कोटी ८४ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थात सर्वात जास्त प्रमाण चरसचे आहे. सुमारे ४२ किलो चरस ताब्यात घेण्यात आला. तसेच गांजा, एमडीएमए, एलएसडी पेपर्स, कोकेन, मारीजुआना, हेरोईन सारख्या पदार्थाचा समावेश होतो.

मागील काही महिन्यापासून पोलिसांच्यावतीने या व्यवसायात गुंतलेल्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सदरची मोहीम हाती घेताना ज्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाले आहेत किंवा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत असेही आरोपी पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. पर्यटन हंगामा सुरू होण्यापूर्वी अमली पदार्थाच्या पसारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहिम हाती घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकgoaगोवाPoliceपोलिसbusinessव्यवसाय