शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीला कपाटात कोंडून ठेवल्याच्या गुन्हय़ाखाली सरकारी वकील दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:17 IST

घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीस लोखंडी कपाटात कोंडून ठेवून तिच्या जीवाला धोका पोहोचविण्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणा-याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यांनी दोषी ठरविले.

मडगाव - घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीस लोखंडी कपाटात कोंडून ठेवून तिच्या जीवाला धोका पोहोचविण्याच्या आरोपाखाली सोमवारी दक्षिण गोव्याच्या सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणा-या लादिस्लाव फर्नाडिस यालाच मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई यांनी दोषी ठरविले. गोव्याच्या न्यायालयीन इतिहासात एक सरकारी वकीलच गुन्हेगार म्हणून दोषी ठरण्याची ही पहिलीच वेळ असून या प्रकरणात शिक्षेसंबंधी युक्तीवाद करण्यासाठी 14 जानेवारीर्पयत ही सुनावणी तहकूब करण्यात आली.फर्नाडिस यांना भादंसंच्या 323 (दुखापत करणे), 341 (बळजबरीने अडवणूक करणे) व 346 (बंद जागेत कोंडून ठेवणे) या कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. या गाजलेल्या प्रकरणात खास सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रितम मोराईस यांनी काम पाहिले.2006 साली घडलेल्या आणि त्यावेळी संपूर्ण राज्यात अत्यंत गाजलेल्या या प्रकरणात सुरुवातीला संशयित फर्नाडिस याच्याविरोधात अल्पवयीन मुलीला कामाला ठेवले म्हणूनही आरोप ठेवण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत सदर मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाल न्यायालयाकडून हे प्रकरण मडगाव प्रथम वर्ग न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. बाल हक्क चळवळीतील संस्था असलेल्या जन उगाई या संस्थेने हे प्रकरण पोलिसांर्पयत पोहोचविले होते.या प्रक़रणाची पार्श्वभूमी अशी की, त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम करणारे फर्नाडिस यांनी मूळ ओरिसा येथील बसंती पसरीचा या मुलीला आपल्याकडे मोलकरीण म्हणून कामाला ठेवले होते. सदर मुलीने दिलेल्या जबानीप्रमाणे, काम करताना तिचा छळही केला जात होता. त्यामुळे तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला कोलवा पोलिसांनी पुन्हा फर्नाडिस यांच्या घरी आणून सोडताना सदर मुलीला तिच्या घरी पाठविण्याचा सल्ला दिला होता. असे असतानाही फर्नाडिस यांनी त्या मुलीला घरी न पाठविता आपल्याच घरी कामाला ठेवले. याची वर्दी जन उगाई या संस्थेला मिळाल्यानंतर 24 ऑगस्ट 2006 रोजी या संस्थेकडून पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर संशयिताच्या कोलवा येथील घरी पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी फर्नाडिस यांनी सदर मुलीला लोखंडी कपाटात बंद करुन त्या कपाटाला चावी केली आणि सदर मुलगी आपल्या घरी नाहीच, असा बहाणा केला होता. पोलीस उपनिरीक्षक गुरुदास कदम यांनी घराची झडती घेतली असता, त्यांना हे बंद कपाट दिसून आल्यावर संशयिताला ते उघडण्यास भाग पाडले असता, सदर मुलगी अस्वस्थावस्थेत त्या कपाटात कोंडून ठेवल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवाCrime Newsगुन्हेगारी