शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:59 IST

Cyber Attacks : यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ३० हजारांवर सायबर हल्ले.

नवी दिल्ली : देशात कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट सेफ नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्याचे ट्वीटही यावेळी करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सरकारी संस्थांवर ३० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले आहेत. २०२० मध्ये सरकारी संस्थांवर ५० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन कॉम्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांना ट्रॅक आणि मॉनिटर करत आहे. २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ११,५८,२०८ आणि १२,१३,७८४ सायबरशी संबंधित घटना झाल्या आहेत. यातील २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ५४,३१४ आणि ३२,७३६ घटना सरकारी संघटनांशी संबंधित होत्या. 

स्ट्राँग पासवर्ड बनवा, अपडेट करत राहावेट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा, वेगवेगळे ई-मेल आयडी बनवा, फिशिंग लिंकवर क्लिक करू नका, रिमेंबर पासवर्डचा वापर नको, सगळ्या खात्यांचा पासवर्ड वेगळा असावा, ब्राऊजर हिस्ट्री डिलीट करा, अँटी व्हायरस प्रोग्रॅमचा वापर करा, पब्लिक वाय-फायचा वापर करू नये, सायबर कॅफेवर लाॅगईन करू नका आणि अकाऊंट लॉग आऊट असावे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमGovernmentसरकार