शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

 नागपुरात  क्षुल्लक कारणावरून गुंडांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:31 AM

बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात घडवून आणणाऱ्या गुंडांनी अपघातग्रस्त तरुणाला सिमेंटच्या विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच बाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला आरोपींच्या तावडीतून वाचविले आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : कुख्यात अंकुर धकातेला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात घडवून आणणाऱ्या गुंडांनी अपघातग्रस्त तरुणाला सिमेंटच्या विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच बाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला आरोपींच्या तावडीतून वाचविले आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या पेट्रोल पंपानजीक ही संतापजनक घटना घडली. अंकुर दीपक धकाते (वय २२, रा. नरेंद्रनगर) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे.राहुल अनिल गाडगे (वय २७, रा. कस्तुरीनगर, गोटाडपांजरी) आणि त्याचा मित्र स्वप्निल ठाकरे (वय ३० रा. बालाजीनगर, गजानन मंदिराजवळ) हे दोघे बुधवारी रात्री वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये लग्नासाठी गेले होते. रात्री ९.१५ ला तिकडून परत येत असताना नरेंद्रनगर चौकातील पेट्रोल पंपाजवळ अचानक आरोपी अंकुर आणि त्याच्या एक अल्पवयीन साथीदाराने वेगात पल्सर राहुलच्या दुचाकीजवळून नेली. त्यामुळे राहुल गोंधळला अन् त्याची दुचाकी स्लीप झाली. दोघेही खाली पडून जखमी झाल्याने राहुलचा मित्र स्वप्निल याने पल्सरवरील आरोपी तरुणांना व्यवस्थित दुचाकी चालव असे म्हटले. या क्षुल्लक कारणावरून आरोपी पल्सरचालक अंकुर धकाते आणि त्याचा अल्पवयीन साथीदार दुचाकी बाजूला ठेवून स्वप्निल ठाकरेच्या अंगावर धावून आले. त्यांनी त्याला हातबुक्कीने मारहाण करून रस्त्यावर पडलेली सिमेंटची विट उचलली. स्वप्निलच्या डोक्यावर, कपाळावर मारून त्याला गंभीर जखमी केले. राहुल मित्राला वाचविण्यासाठी गेला असता त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात स्वप्निल ठाकरे गंभीर जखमी झाल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी धाव घेतली आणि आरोपींना पकडले. पोलिसांना माहिती कळविण्यात आली. बेलतरोडीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. स्वप्निलला रुग्णालयात हलविण्यात आले. एएसआय सय्यद मुस्ताक यांनी राहुलची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी आरोपी अंकुर धकातेला प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याच्या आरोपाखाली अटक केली तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.आरोपी अट्टल गुन्हेगारबेलतरोडी पोलिसांनी आरोपी अंकुर धकाते आणि त्याच्या साथीदाराचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता, ते दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही तपासात उघड झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर