शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुडविन ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 14:41 IST

शेकडो ग्राहकांना फसवून करोडो रुपये घेऊन मालक पसार

ठळक मुद्देफसवणूक झालेल्या ग्राहकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ऐन दिवाळीमध्ये लोकांची फसवणूक झाल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नालासोपारा - वसई पश्चिमेकडील स्टेला परिसरात असलेल्या गुडविन ज्वेलर्सने ऐन दिवाळीत शेकडो ग्राहकांची फसवणूक करत करोडो रुपयांना चुना लावून पसार झाले आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील बऱ्हामपूर येथील स्टेला पेट्रोलपंपांच्या मागे असलेल्या कर्मा अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/101 मध्ये राहणाऱ्या सुनीता महेंद्र श्रीरामदार (52) यांनी 1 सप्टेंबर 2018 रोजी गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर भालानंदन व मालक यांनी व्याजाचे व मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवून त्यांच्या स्कीममध्ये सुनीता आणि त्यांच्या मुलीला व असंख्य ग्राहकांना पैसे भरण्यास भाग पाडले. त्यांची मुलगी मधुरा आशिष संगावार हिने 1 सप्टेंबरला 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली असता ते माघारी न करता फसवणूक केलेली आहे. काही ग्राहकांकडून सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने आगाऊ रक्कम व जुने सोने घेऊन ते माघारी न करता त्यांचीही फसवणूक केले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्या ग्राहकांनी ज्वेलर्सच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ऐन दिवाळीमध्ये लोकांची फसवणूक झाल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस