शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 15:11 IST

Good News of Maharashtra Police : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ वरून ८ करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना १२ तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडत तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा सणासुदीच्या दिवशी, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासापेक्षा जास्त कर्तव्य पोलिसांना बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून पोलीस दलासाठी एक खुशखबर आहे. यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये चांगला असा ताळमेळ घालणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार', असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई