शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सोनाराने घातला गुंतवणूकदारांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 01:42 IST

पश्चिमेतील गोपीनाथ चौक परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सचा मालक गारळे याने भिशी योजना सुरू केली होती. भिशी भरणाऱ्यांना त्याने आपल्या दुकानातून दागिने बनवल्यास घडणावळ घेतली जाणार नाही, असे प्रलोभन दाखवले.

डोंबिवली : भिशी चालू केल्यास दागिने बनवताना घडणावळीचा खर्च घेतला जाणार नाही, असे प्रलोभन दाखवून एका सोनाराने गुंतवणूकदारांना चार लाख ८८ हजार ४४६ रुपयांचा गंडा घातल्याची घटना पश्चिमेत उघडकीस आली आहे. दुकान बंद करून पळून गेलेल्या अजित गारळे (२४, रा. कोपर रोड) याच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.पश्चिमेतील गोपीनाथ चौक परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सचा मालक गारळे याने भिशी योजना सुरू केली होती. भिशी भरणाऱ्यांना त्याने आपल्या दुकानातून दागिने बनवल्यास घडणावळ घेतली जाणार नाही, असे प्रलोभन दाखवले. त्याला बळी पडलेल्या जयेश जाधव (२९, रा. कुंभारखाणपाडा) यांनी जानेवारी २०१९ पासून प्रतिमहिना पाच हजार रुपये भिशी योजनेत भरण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२० मध्ये जाधव यांनी सहा तोळ्यांचे मंगळसूत्र बनवायचे असल्याचे गारळे याला सांगितले. त्यावेळी, गारळे याने सोन्याचा दर ४० हजार रुपये असल्याचे जाधव यांना सांगत मंगळसूत्र बनविण्यासाठी दोन लाख ४० हजारांचा खर्च सांगितला. त्यानुसार, जाधव यांनी ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने त्याला दिले. त्या दागिन्यांची किंमत गारळेने एक लाख ५५ हजार रुपये होईल, असे जाधव यांना सांगितले. त्यानंतर, जाधव यांनी मंगळसूत्र बनविण्यासाठी १२ हजार रुपये जमा केले. भिशीचे ७० हजार रुपये गारळेकडे जमा होते. दोन लाख ३७ हजार रुपयेही जाधव यांनी जमा केले. मार्चमध्ये जाधव यांना सहा तोळ्यांचे मंगळसूत्र गारळे देणार होता. त्यामुळे, ९ मार्चला लक्ष्मी ज्वेलर्समध्ये जाधव गेले असता हे दुकान बंद होते. जाधव यांनी गारळेशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गारळेचा फोन बंद असल्याने त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेही बंद असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले.अन्य गुंतवणूकदारांचीही केली फसवणूकलक्ष्मी ज्वेलर्सच्या गारळे याने जाधव यांच्यासह परिसरात राहणाºया कल्पेश कळंबे, सुचिता पिरवरे, गीता कांबळे, अरुण नरसले तसेच अन्य गुंतवणूकदारांचीही फसवणूक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी