शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विमानतळावर आठ कोटींचे सोने जप्त; मुंबईत कस्टम विभागाची धडक कारवाई, ७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:27 IST

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना या व्यक्तीकडे १५ सोन्याचे बार आढळून आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने गुरुवारी केलेल्या विशेष ऑपरेशनमध्ये एकूण १५ किलो सोने जप्त करण्यात आले असून, याची किंमत ७ कोटी ८४ लाख रुपये इतकी आहे. याखेरीज २२ लाख रुपये मूल्याचे परदेशी चलनदेखील जप्त केले आहे. एकाचवेळी केलेल्या सहा शोध कारवायांमधून सातजणांना अटक केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, दुबई येथून गुरुवारी संध्याकाळी आलेल्या एका भारतीय प्रवाशाने आणलेले तब्बल ९ किलो ८९ ग्रॅम सोने कस्टम विभागाने पकडले असून, याची किंमत ५ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशाने शर्टाच्या आतील बाजूला एक कापडाचा खण असलेली एक पट्टी तयार करून त्यामध्ये हे सोने लपविले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना या व्यक्तीकडे १५ सोन्याचे बार आढळून आले. दोन सुदानी नागरिकांनी सोने दिल्याची माहिती या भारतीय व्यक्तीने दिली. त्यानंतर, त्याच विमानातून आलेल्या दोन्ही सुदानी नागरिकांनाही अटक केली. तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये, शारजातून चेन्नईमार्गे मुंबई गाठलेल्या एका व्यक्तीकडून १ किलो ८० ग्रॅम सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. याची किंमत ९९ लाख रुपये इतकी आहे. हे सोने त्याने त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये लपविले होते. 

तिसऱ्या घटनेत जेहाद येथून आलेल्या दोन भारतीयांकडून अनुक्रमे १०६८ ग्रॅम आणि ११८६ ग्रॅम सोने पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या सोन्याची अनुक्रमे किंमत ५६ लाख आणि ५८ लाख रुपये इतकी आहे. चौथ्या घटनेमध्ये एका सुदानी नागरिकाकडून ९७३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, याची किंमत ५१ लाख रुपये इतकी आहे. तर, उर्वरित दोन कारवायांमध्ये दुबईतून आलेल्या दोन भारतीयांकडून २२ लाख रुपये भारतीय मूल्य असलेल्या दुबईचे चलन जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Goldसोनं