शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात लपवले सव्वाकोटीचे सोने; विमानतळावर एकाला अटक; बँकॉकहून आलेल्या प्रवाशावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:02 IST

शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बँकॉकहून मुंबईत पत्नीसह आलेल्या गुजरातच्या एका प्रवाशाला सोने तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याने शरीरामध्ये सव्वाकोटी रुपयांचे सोने लपवले होते. मोहम्मद वासिफ शेख, असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव आहे. 

शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. ते दोघेही ग्रीन चॅनलमधून बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्याकडे शुल्क भरण्यासारखे काही सामान आहे का, याची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. मात्र, त्याच्या उत्तराने समाधान न झाल्याने अधिकाऱ्यांनी त्याची एक्स-रे चाचणी केली. त्यात त्याने गुदद्वारामध्ये सोने लपवल्याचे आढळले.

पत्नीवर गुन्हा नाही... आरोपीच्या पत्नीच्या सामानातदेखील काही सोने सापडले. मात्र, या सोन्याच्या तस्करीत आपल्या पत्नीचा काहीही संबंध नाही. आपण केवळ तिला एक पॅकेट दिले आणि ते बॅगेत ठेवण्यास सांगितले. त्यात काय आहे, याची माहिती तिला नव्हती, असे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्या कबुलीनंतर अधिकाऱ्यांनी केवळ त्याच्यावरच तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने या तस्करीसाठी ४० हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्यामुळे आपण तस्करी केल्याची कबुलीदेखील त्याने अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :Goldसोनं