शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी नागरिकांकडून मुंबईत सोन्याची तस्करी, २१ कोटींचे सोने जप्त; डीआरआयने केला रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 05:40 IST

कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागाचा देखील भंडाफोड करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

मुंबई :

परदेशातून तस्करीच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सोन्याचा माग काढतानाच, या सोन्यावर प्रक्रिया आणि साठवणूक करण्यात येणाऱ्या मुंबईतील एका ठिकाणावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी छापेमारी करत २१ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागाचा देखील भंडाफोड करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून परदेशी नागरिकांच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या सोने तस्करीचा पॅटर्न डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासला होता. तसेच त्यावर पाळत ठेवली होती. या दरम्यान काही विशिष्ट परदेशी नागरिक सातत्याने भारतामध्ये येत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच इथे आल्यावर ज्या भारतीय नागरिकांशी ते संपर्क करत त्यांची देखील माहिती अधिकाऱ्यांनी जमा केली. ही माहिती जमा केल्यानंतर सोन्याच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट सुरू असल्याचे त्यांना समजले.

अशी होते तस्करी !      सोन्याची पावडर, पेस्ट किंवा कॅप्सूलमध्ये सोने दडवून ते पोटात साठवून ही तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.      हे सोने मुंबईत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवले जाते आणि तिथे त्यावर प्रक्रिया करून मुंबई तसेच अन्य शहरांतील व्यापाऱ्यांना विकले जाते.     विशेष म्हणजे, हे सोने विकणाऱ्याला आणि विकत घेणाऱ्याला एक सिक्रेट कोड दिला जात असे. तो कोड सांगितल्यावर खात्री पटल्यावरच याचा व्यवहार होत असे. 

     मुंबईत तस्करीचे हे रॅकेट कुठून सुरू आहे, याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान तेथून २१ कोटी रुपये मूल्याचे ३६ किलो सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. तर ज्या जागेतून ही तस्करी सुरू होती, त्या मालकाकडे अवैधरीत्या असलेली २० लाख रुपयांची रक्कमदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी