शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चांदीचा मुलामा देऊन सोन्याची तस्करी; दीड कोटींच्या सोन्यासह तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 23:35 IST

नेब्युलायजरच्या नावाखाली दीड कोटींच्या सोन्याची तस्करी

ठळक मुद्दे. अहमद मोहम्मद बेद्रा (56), महेंद्र काटे (48) आणि रविंद्र सोनार (38) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. बेद्राला प्रत्येक कन्सायमेंटमागे 50 हजार रुपये मिळत होते. गेल्या काही काळात बेद्राने 10 वेळा अशापद्धतीने माल आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

मुंबई - नेब्यूलायजरच्या नावाने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन दलालांसह तिघांना अटक केली. याप्रकरणी साडे चार किलो सोने हस्तगत केले असून त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. अहमद मोहम्मद बेद्रा (56), महेंद्र काटे (48) आणि रविंद्र सोनार (38) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींपैकी काटे व सोनार दोघेही सीमाशुल्क दलाल असून बेद्रा हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्याने  सांगितले. सहार कार्गोमध्ये आयात करून आलेल्या 15 खोक्‍यांमधून सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार हा माल ताब्यात घेऊन तपासणी केली असता सहा खोक्‍यांमधील नेब्यूलायजरमध्ये मशीनच नसल्याचे दिसून आले. त्यात चांदीचा मुलामा देऊन सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या मालाचे दलाल सोनार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याला काटेने हे सोने दिल्याचे उघड झाले आहे. पुढे काटेच्या चौकशीत अजय ऊर्फ अहमद बेद्रा याचा हा माल असल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांनाही डीआरआयने अटक केली. चौकशी बेद्राला हा माल केरळातील एका व्यक्तीने त्याच्यामार्फत मागवला असल्याचे सांगितले. या मालासाठी बेद्रा काटे व सोनार यांना 20 ते 22 हजार रुपये देत होता. तसेच बेद्राला प्रत्येक कन्सायमेंटमागे 50 हजार रुपये मिळत होते. गेल्या काही काळात बेद्राने 10 वेळा अशापद्धतीने माल आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :ArrestअटकDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय