शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:21 IST

बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर अडचणीत आल्या आहेत.

नाशिक - महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात राज्यात चर्चेत आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून तपास करण्याचे आदेश दिलेत. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे एसआयटीचे प्रमुखपद दिले आहे. खरात प्रकरणातील तपासात बरेच आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो हाती लागले आहेत. सेलेब्रिटीपासून अनेक राजकीय मंडळी खरातचे भक्त होते.

अशोक खरात याने राजकीय नेते, प्रशासनातील बडे अधिकारी त्याशिवाय सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमवली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. नाशिक शहर, सिन्नर येथे आलिशान बंगले, मीरगाव येथे फार्म हाऊस सोबतच अनेक जमिनी स्वत: तसेच कुटुंबियांच्या नावे आहेत. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशी एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. 

तपासात आता पुढे काय?

'एसआयटी'कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे.

नोकराकडूनच धमकी ?

नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डीच्या तक्रारदार तरुणीच्या माहितीनुसार नाशिकला खरातच्या कार्यालयात नीरजशी ओळख झाली. जाधव बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या 

बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru's Fortune: Gold, Cars, Farmhouse - Kharaat's Assets Exposed

Web Summary : Ashok Kharaat, accused of exploiting women, amassed ₹200 crore via political connections. SIT investigates assets, videos, and financial sources. An office boy allegedly blackmailed him. Calls grow for Rupali Chakankar's resignation.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारी