शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानमध्ये काश्मिरी जनता रस्त्यावर उतरली
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
6
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
7
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
8
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
9
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
10
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
11
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
12
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
13
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
14
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
15
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
17
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
18
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
19
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
20
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ

मानवी कवटीमुळे फुटली दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 10:59 PM

एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे.

 मडगाव - गोव्यातील मडगाव शहरात एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे. भिमसेन कोदागन्नूर (45) या इसमाचा जून 2008 साली खून झाला होता. मडगाव पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करताना कर्नाटकातील बिजापूर जिल्हयातील कोन्नूर येथून परशुराम जत्तप्पा दोरहनहल्ली (35) याला जेरबंद केले आहे.आज शनिवारी त्याला मडगावात आणून मागाहून रितसर अटक केली. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. मयत भीमसेन याचे संशयिताच्या आईशी अनैतिक संबध होते. दारुच्या नशेत तो तिला तसेच परशुराम व त्याच्या दोन बहिणींना मारहाण करीत होता. असाच एके दिवशी त्याने दारुच्या नशेत भांडण उरकरुन काढले असता, परशुराम व तिची आई रेणुका याने भीमसेन याला मारहाण केली होती. मारहाणीनंतर तो बेशुध्द पडला असता त्याचा गळा आवळला होता. मागाहून तो मरण पावल्यानतंर त्याचा मृतदेह पुरुन टाकण्यात आला होता. जून 2008 साली ही घटना घडल्यानंतर चार दिवसांनतर परशुराम व त्याचे कुटुंबिय गोव्यातून आपल्या मूळ गावी गेले होते.आके येथील शेख इस्माईल याच्या मालकीच्या घराशेजारी असलेल्या स्टोअररुममध्ये रेणुका, तिचा मुलगा परशुराम व दोन मुलीसमवेत रहात होत्या. रेणुका हिचा पती बिजापूर येथे असून, मडगावात आल्यानंतर तिचे भीमसेनशी अनैतिक संबध जुळले होते. त्यातून भिमसेन हा तिच्या घरी ये - जा करीत होता. शेख इस्माईल हा पुर्वी दुबईला कामाला होता. भीमसेन बेपत्ता झाल्यानंतर रेणुका कुणालाही काहीही न सांगता अचानक आपल्या कुटुंबियांसमवेत नाहीशा झाल्या होत्या. त्यानंतर रेणुकाने आपला नवरा बेपत्ता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी रेणुकाच्या एका मुलीने त्यांना मालमत्तेच्या वादावरुन आपल्या आई - वडीलांचा खून झाल्याचे सांगितले होते.शनिवारी या खोलीत मानवी कवटी व हाडे सापडल्यानंतर मडगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यावेळी त्यांना तिरप्पा नावाची एक व्यक्ती भिमसेनला ओळखत असल्याची माहिती मिळाली. तिरप्पा व भिमसेन हे दोघेही व्यवसायाने टाईल्स फिटर होते. त्यामुळे ते एकमेकांचे परिचयाचे होते. पोलिसांनी तिरप्पा याला बोलावून घेउन चौकशी केली असता, मुलगा व बायको आपल्याला मारहाण करीत असल्याचे भीमसेन हा आपल्याला सांगत होता अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. भिमसेनचा पत्ता मिळविल्यानतंर पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक बिजापूरला पाठवून देण्यात आले. तेथे पोलिसांनी तपास केला असता, परशुराम याने गावातील मालमत्ता विकून तो गाव सोडून कोन्नूर येथे रहात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानंतर कोन्नूर येथे जाउन पोलिसांनी परशुरामाला ताब्यात घेतले. रेणुका हिने किटकनाशक औषध घेउन यापुर्वीच आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.परशुराम याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 302 व 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू असून, उदया मंगळवारी त्याला रिमांडासाठी न्यायालयात उभे केले जाणार आहे. रेणुका हिच्या दोन मुलीचा या खून प्रकरणात सहभाग आहे का याचाही सदया पोलीस तपास करीत आहे. त्या दोघांचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून