शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"दुसऱ्या खोलीत झोपायचो म्हणून भांडायची"; लेकाची हत्या करणाऱ्या सूचनाचा नवरा म्हणतो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:35 IST

Suchana Seth : सूचनाचा नवरा वेंकटरमनने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

सूचना सेठने गोव्यामध्ये आपल्या चार वर्षांच्या लेकाची हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूचनाचा नवरा वेंकटरमनने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. मुलाच्या जन्मानंतर मी दुसऱ्या खोलीत झोपू लागलो, या गोष्टीवरून माझी बायको माझ्याशी सतत भांडायची. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीचा दोष मला देते, माझ्यावर आरोप करायची तिला सवय आहे. मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं अशी माहिती सूचना सेठच्या पतीने दिली आहे. 

वेंकटरमनने दिलेल्या माहितीनुसार, "9 वर्षांपासून आमच्यामध्ये सर्व काही ठीक होतं. पण 2019 मध्ये आम्हाला मुलगा झाला तेव्हापासून सूचनाच्या वागण्यात खूप बदल झाला. माझा मुलगा लहान होता म्हणून मी दुसऱ्या खोलीत झोपू लागलो. मात्र सूचना या मुद्द्यावरून माझ्याशी सतत भांडू लागली. मुलाची जबाबदारी मी घेत नाही, असं म्हणायची. या गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि पुढे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं."

"माझ्या मुलाला मला भेटायचं होतं. पण सूचनाला हेच आवडायचं नाही. यापूर्वी तिने मला माझ्या मुलाला भेटू दिलं नाही. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर मला माझ्या मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. डिसेंबर 2022 पर्यंत मी माझ्या मुलाला भेटू शकलो नाही. पण न्यायालयाच्या आदेशानुसार मी माझ्या मुलाला जानेवारी 2024 पासून भेटू शकणार होतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला माझ्या मुलाला भेटायचे होतं. पण सूचना त्याला गोव्याला घेऊन गेली. याबाबत तिने कोणालाही सांगितलं नाही."

"मी माझ्या मुलाला भेटण्याची वाट पाहत होतो. ठरलेल्या तारखेला (7 जानेवारी) संध्याकाळपर्यंत मी त्या ठिकाणी वाट पाहत राहिलो की माझ्या मुलाला घेऊन सूचना येईल आणि मी त्याला भेटू शकेन. मी मुलाची वाट पाहत राहिलो, पण ती आली नाही. मी सूचनाला अनेकदा फोनही केला. पण तिने माझा कॉल उचलला नाही. तुम्ही ठीक आहात का? असा मेसेजही केला पण तिने मेसेजचा रिप्लाय देखील दिला नाही" असं वेंकटरमनने म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी