शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

Prashant Kishor : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या गोव्यातील कार्यालयात ड्रग्ज सापडलं; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 11:12 IST

Prashant Kishor And Goa Assembly Elections 2022 : गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या I-PAC या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या गोव्यातील कार्यालयात ड्रग्ज सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या I-PAC या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचं काम पाहत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. 

गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिम भागातील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. या परिसरातील आठ बंगले हे प्रशांत किशोर यांच्या आय पॅक या कंपनीने भाडे तत्त्वावर घेतले आहेत. या बंगल्यावर मारलेल्या छाप्यात एका 28 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ अमली पदार्थ सापडले आहेत. या कर्मचाऱ्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

भाजपचा २०२४ मध्ये पराभव शक्य, पण...; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सांगितलं गणित

निवडणूक (Election) रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) संभाव्यतेबद्दल आपले मत उघडपणे मांडले आहे. "भाजपनं हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोककल्याणकारी धोरणांचे भक्कम आख्यान तयार केलं आहे. विरोधी पक्षांना यापैकी किमान दोन आघाड्यांवर भाजपला मात द्यावी लागेल," असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, 2024 मध्ये भाजपला पराभूत करू शकणारी अशी विरोधी आघाडी उभारण्यास मदत करू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितलं. 

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य आहे. मात्र विरोधकांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपला पराभूत करणं कदाचित शक्य नाही. मला अशी विरोधी आघाडी तयार करायची आहे, जी 2024 मध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊ शकेल, असं प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाथतीत यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेच्या 200 जागांचा उल्लेक केला, ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट टक्क होणार आहे. या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं 95 जागा मिळवल्या आहे, तसंच त्या 195 मध्ये बदलू शकतात. "ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल त्यांना कमीतकमी 5 ते 10 वर्षांची रणनिती तयार करावी लागेल. हे पाच महिन्यांत होणं अशक्य आहे," असंही ते म्हणाले.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Drugsअमली पदार्थ