शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करा; कुटुंबीयांचा उच्च न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:53 IST

पानसरे यांच्या हत्याकटातील प्रमुख आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यात एसआयटीला यश आलेले नाही

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, लेखक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या सगळ्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना जेरबंद करण्यात तपासयंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. या चारही हत्यांमागील सूत्रधाराचा तपास करण्यासाठी दाभोलकर आणि पानसरे हत्याकटाचा तपास सीबीआय आणि एसआयटी यांच्याकडून काढून घेत महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करावा, असा अर्ज दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने २१ जुलैपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

पानसरे यांच्या हत्याकटातील प्रमुख आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यात एसआयटीला यश आलेले नाही. २०१० मध्ये गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोपही सारंग याच्यावर आहे. एनआयएही उभयतांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरली आहे. तपासाधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे कामाचा अतिरिक्त भार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पानसरे व दाभोलकर हत्याकटाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करावा, अशी विनंती पानसरे आणि दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाला केली. 

तपासाधिकाऱ्याच्या बदलीचा मार्ग मोकळापानसरे हत्याकटाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमली. कोल्हापूरचे अतिरिक्त अधीक्षक तिरुपती काकडे या प्रकरणातील तपासाधिकारी आहेत. मार्च, २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची बदली न करण्याचे आदेश दिले. साडेचार वर्षे काकडे एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची बदली करण्याची परवानगी मिळावी, यासाठी  सरकारने कोर्टात अर्ज केला. काकडेंच्या जागी त्यांच्याच दर्जाच्या अधिकाऱ्याची पानसरे प्रकरणी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करू, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर