शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअप न करणाऱ्या बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडने अपहरण केले; त्यानंतर जे घडले त्याने पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:40 IST

प्रेयसीने शिवरामचं न ऐकता त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर ती नव्या प्रियकरासोबत राहू लागली

एर्नाकुलम - केरळच्या एर्नाकुलम इथं हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी प्रेयसीनं तिच्या प्रियकराचे अपहरण केले. त्यानंतर त्याला बेदम मारले. एवढ्यावरच मन भरले नाही म्हणून प्रियकराला नग्न करून त्याचा व्हिडिओ बनवला आणि विना कपडे त्याला रस्त्यावर फेकले. जर ही गोष्ट बाहेर सांगितली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही प्रेयसीने दिली. 

पीडित प्रियकराने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली आहे. या कामात प्रेयसीला मदत करणाऱ्या अन्य ७ जणांनाही अटक करण्यात आली आहे. एर्नाकुलमच्या वर्कला इथं राहणाऱ्या १९ वर्षीय लक्ष्मीप्रियाचे शिवराम नावाच्या युवकाशी अफेअर सुरू होते. त्याचवेळी लक्ष्मीप्रियाची भेट अन्य एका युवकाशी झाली. दोघांमध्ये मैत्री होऊन प्रेमात पडले. याची माहिती शिवरामला झाली. त्याने प्रेयसीला समजवण्याचा प्रयत्न केला. 

प्रेयसीने शिवरामचं न ऐकता त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर ती नव्या प्रियकरासोबत राहू लागली. तरीही शिवरामने तिचा पाठलाग सोडला नाही. ही बाब प्रेयसीच्या तिच्या नव्या प्रियकराला सांगितली. तेव्हा दोघांनी मिळून शिवरामला धडा शिकवण्याचा कट रचला. प्रेयसीने काही रुपये देऊन लोक भाड्याने घेतली. शिवरामला व्हॉट्सअपला मेसेज केला. लक्ष्मीप्रियाने लोकेशन पाठवून त्याला भेटायला बोलावले. त्याठिकाणी नव्या प्रियकरासह इतर ६ जण वाट पाहत होते. शिवराम तिथे पोहचताच त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. 

दारू-गांजा पाजला, निर्वस्त्र केले अन्...अपहरणानंतर प्रेयसीने नवीन प्रियकर आणि साथीदारांसह शिवरामला जबरदस्ती दारू पाजली, गांजा दिला. त्यानंतर बेदम मारले. इतकेच नाही तर शिवरामला निर्वस्त्र करून त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याच अवस्थेत त्याला वायटिला रोडवर सोडून दिले. जर कुणालाही या घटनेबाबत सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी शिवरामला दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार शिवरामने पोलिसांना सांगितला. तात्काळ पोलिसांनी दखल घेत लक्ष्मीप्रियासह ६ जणांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.