शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:53 IST

मुलीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचे होते, परंतु वडिलांचा याला तीव्र विरोध होता. म्हणून...

आपल्याच पसंतीच्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने एका क्रूर बापाने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील बहादुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपी पित्याने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासामुळे हे सत्य बाहेर आले आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गीला रोपा गावात राहणाऱ्या बलिहार सिंह याने आपली मुलगी गुरनीत हिचा खून केला. गुरनीतला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचे होते, परंतु वडिलांचा याला तीव्र विरोध होता. याच वादामुळे २३ ऑगस्ट रोजी आरोपीने गुरनीत झोपलेली असताना तिच्या खोलीत जाऊन तिचा गळा दाबून खून केला.

खून लपवण्यासाठी केला 'हा' प्रयत्नमुलीची हत्या केल्यानंतर पित्याने या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. त्यानंतर घाईगडबडीत तिचा अंत्यसंस्कार करून अस्थीही विसर्जित केल्या. सुरुवातीला पोलिसांनाही हा आत्महत्येचाच प्रकार वाटला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुरनीतच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा आईने पतीच्या धमक्यांना घाबरूनही हे संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड केले.

दोन दिवसांपासून होता संधीच्या शोधातपोलिसांनी आरोपी बलिहार सिंहला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले की, 'गुरनीत वारंवार तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्याबाबत माझ्याशी वाद घालत होती. तिच्या हट्टीपणामुळे मी खूप संतापलो होतो आणि गेल्या दोन दिवसांपासून संधीच्या शोधात होतो. २३ ऑगस्ट रोजी ती दुपारी झोपलेली असताना, मी तिचा गळा दाबून खून केला.'

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे पित्याचा क्रूर चेहरा समोर आला असून, त्याला आता कायद्यानुसार शिक्षा होणार आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश