शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:36 IST

विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. 

नालासोपारा : विरारमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये जंगल परिसरात १९ वर्षीय पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर बुधवारी संध्याकाळी बसले होते. त्यावेळी येथे आलेल्या दोन्ही आरोपींनी प्रियकराच्या गळ्यातून सोन्याचे पेंडल खेचून पळ काढला. दोघेही ते सोन्याचे पेंडल विकण्यासाठी गेले. पण, कोणीही ते विकत घेतले नाही म्हणून दोन्ही आरोपी संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमारास परत त्या परिसरात गेले. त्यावेळीही प्रियकर आणि प्रेयसी तिथेच बसलेले होते.

यावेळी दोन्ही नराधम आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. दोघेही आरोपी मजबूत देहयष्टीचे होते, तर प्रियकर किरकोळ प्रकृतीचा आहे. त्यामुळे त्याने विरोध करूनही आरोपींनी जुमानले नाही. तसेच तेथून मदतीसाठी केलेली याचनाही कुणाला ऐकू गेली नाही. त्यावेळी विरोध करताना प्रियकराने बाजूला पडलेली काचेची बाटली एका आरोपीच्या डोक्यावर मारली. त्यात आरोपी जखमी झाला. त्यानंतर दोघेही पळून गेले. 

डॉक्टरांकडून जखमी आरोपीची माहितीही माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणीला उपचारासाठी डॉक्टरकडे पाठविले आणि फरार दोन्ही आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. एक आरोपी जखमी झाल्याने जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असेल, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी व्हाॅट्स ॲपच्या ग्रुपवर ही माहिती टाकल्यावर एका डॉक्टरांनी असा आरोपी उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार विरार पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक केली.  दरम्यान, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अशा कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी