शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने इन्स्टावर शोधली तिच्यासारखीच दिसणारी तरूणी, नंतर या कारणाने केली तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:06 IST

आरोपी तरूणीचं काही कारणाने तिच्या परिवारासोबत भांडण सुरू होतं. याच कारणाने तिने तिचा मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी खदीदजा ओ नावाच्या तरूणीची हत्या केली.

एका तरूणीने स्वत:ला मृत दाखवण्यासाठी तिच्यासारखी दिसणाऱ्या एका तरूणीची हत्या केली. आरोपी तरूणीने या तरूणीला इन्स्टावर शोधलं होतं. आरोपी तरूणीने 50 वेळा धारदार हत्याराने पीडित तरूणीवर हल्ला केला होता. हैराण करणारी बाब म्हणजे या गुन्ह्यात तिला तिच्या बॉयफ्रेंडने साथ दिली.

आरोपी तरूणीचं काही कारणाने तिच्या परिवारासोबत भांडण सुरू होतं. याच कारणाने तिने तिचा मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी खदीदजा ओ नावाच्या तरूणीची हत्या केली. जेणेकरून तिच्या परिवाराला वाटावं की, आपल्या मुलीचा मृत्यू झाला. 

23 वर्षीय शराबन के वर आरोप आहे की, तिने तिच्या वयाची ब्युटी ब्लॉगर खदीदजा ओ ची जर्मनीच्या इंगोस्डाटमध्ये गेल्यावर्षी हत्या केली होती.चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खदीदजावर 50 वेळा धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. तिची मृतदेह शराबनच्या कारच्या मागच्या सीटवर आढळून आला होता. या कृत्यात शराबनचा बॉयफ्रेंड शेकीर के सुद्धा सामिल होता. 

हत्येनंतर दोघेही लपून होते. जेव्हा पोलिसांना कारमध्ये खदीदजाचा मृतदेह सापडला तेव्हा याबाबत शराबनच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती. नंतर रिपोर्टमधून समोर आलं होतं की, मृत तरूणी ही खदीदजा होती.

याप्रकरणी गेल्या आठवड्यात पोलिसांनी शराबनला खदीदजाच्या हत्येसाठी आरोपी मानलं. कोर्टात वकिल म्हणाले की, शराबनने खदीदजाला इन्स्टावर शोधलं होतं. शराबनला अशी तरूणी हवी होती जी हुबेहूब तिच्यासारखी दिसेल. असंही समोर आलं की, शराबनने अशा अनेक तरूणींना संपर्क केला होता ज्या तिच्यासारख्या दिसत होत्या.

चौकशीतून समोर आलं की, शराबनने इन्स्टावर ब्युटी ब्लॉगर खदीदजाला मेसेज करून तिला कॉस्मेटिकबाबत विचारलं होतं. यादरम्यान शराबनने खदीदजाला भेटण्यासाठी बोलवलं होतं. ज्या दिवशी खदीदजाची हत्या झाली त्या दिवशी शराबनने आपल्या परिवारासमोर एक खोटी कहाणी सांगितली होती. ती म्हणाली होती की, ती तिच्या एक्स हसबंडला भेटायला जात आहे. पण ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटली. नंतर खदीदजाला कारमध्ये बसवून जंगलात घेऊन गेली आणि तिथे तिची हत्या केली. यानंतर शराबनने मुद्दामहून कार अशा ठिकाणी पार्क केली, जिथे ती सहजपणे शोधली जाईल.

पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा हे तर स्पष्ट झालं होतं की, मृत तरूणी ही शराबन नाहीये. त्यानंतर त्यांनी शराबनच्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती घेतली. त्यातून समोर आलं की, ती अशा अनेक तरूणींच्या संपर्कात होती ज्या तिच्यासारख्या दिसत होत्या. त्यानंतर पोलिसांनी शराबनला अटक केली. 

पोलिसांनी सांगितलं की, हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्याचारा अजूनही शोध घेतला जात आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीतील लोकांनी आपली कुशलता दाखवली. हेच कारण आहे की, आरोपी आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली.

टॅग्स :Germanyजर्मनीCrime Newsगुन्हेगारी