शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! आई रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 06:09 IST

कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात  असलेल्या पेठ्याचा पाडा  येथील  या दोघी मंगळवारपासून  बेपत्ता होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी जंगलात सापडले. या दोन्ही मुलींनी आत्महत्या  केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककसारा : आईने जेवण बनविण्यास सांगूनही ते न बनवल्याने चिडलेली आई मैत्रिणीसमोर रागावली. हा राग मनात धरून मनीषा धापटे (१६) या मुलीने व तिची मैत्रीण शोभा धापटे (१६) या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या दोघींचे मृतदेह शनिवारी कसाऱ्याजवळील जंगलात सापडले. 

कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात  असलेल्या पेठ्याचा पाडा  येथील  या दोघी मंगळवारपासून  बेपत्ता होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी जंगलात सापडले. या दोन्ही मुलींनी आत्महत्या  केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी मनीषा हिला तिच्या आईने सकाळी शेतावर जात असताना तू घरीच थांबून दुपारचे जेवण बनवून ठेवायला सांगून तिचे आईवडील शेतावर निघून गेले. नंतर मनीषा तिच्या शोभा या मैत्रिणीच्या घरी गेली व तिथे खेळत बसली. दुपारी मनीषाची आई शेतावरून घरी डबा घ्यायला आली असता मनीषाने घरात काहीही बनवले नसल्याचे लक्षात आले. मनीषाही नसल्याने ती मैत्रिणीकडे गेल्याचे समजले. मनीषाची आई शोभा हिच्या घरी गेली व तिथे मनीषाला जेवण बनवले नाही म्हणून ओरडली व पुन्हा शेतावर निघून गेली. 

आई मैत्रिणीसमोर ओरडली म्हणून मनीषा रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मनीषाच्या पाठोपाठ शोभाही घराबाहेर पडली. मंगळवारी दुपारपासून मनीषा, शोभा बेपत्ता झाल्या. मुली घरी न आल्याने दोन्ही कुटुंबांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. शेवटी स्थानिक ग्रामस्थ व धापटे कुटुंबातील लोकांनी उंबरमाळी, फणसपाडाजवळच्या डोंगरावर शोध सुरू केला असता तिथे मनीषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सकाळी ९ वाजता सापडला. याची माहिती कसारा पोलिसांना कळवली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देवळेकर दाखल झाले. मनीषाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी शोभाचा शोध सुरू केला असता ५०० मीटरच्या अंतरावर शोभाचा मृतदेह दुपारी चार वाजता आढळला. दोन्ही तरुणींनी विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. 

जीवाभावाच्या होत्या मैत्रिणीमनीषा व शोभा या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दररोज एकत्र जेवणार, एक बिस्कीट असेल तरी अर्धे खायच्या असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी भर पावसात तब्बल सहा तास स्थानिक तरुणांना सोबत घेऊन डोंगर, रेल्वेमार्गादरम्यान शोध घेतला.

टॅग्स :Policeपोलिस