शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात मुलीनं अडकवलं”; सुसाईड नोट लिहून युवकाने स्वत:वर गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 13:16 IST

जेव्हा पोलिसांचा तपास सुरु झाला तेव्हा या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडल्याचं दिसून आलं, तो प्रकाराबाबत जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता

ठळक मुद्देदीपक सांगवान नावाच्या व्यक्तीने स्वत:ला गोळी मारली आहे, तो गोयल खुर्द येथील रहिवासी आहेघटनास्थळी एक पिस्तुल, दोन कारतूस आणि एक रिकामी कारतूस जप्त करण्यात आलीमी रश्मीला २ लाख रुपये दिले होते, त्यानंतर मुलीने ती रक्कम चेकद्वारे मला परत केली, परंतु हा चेक बाऊन्स झाला

द्वारका – दिल्लीच्या द्वारका परिसरात एका ४१ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, या युवकाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, यात आरोप होता की, एका महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा नोंद केला आहे, त्या महिलेकडून आणि तिच्या वडिलांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे असा आरोप त्याने केला आहे.

या प्रकरणी द्वारका येथील डीसीपी एसके मीणा यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता द्वारका येथील व्यंकटेश्वर हॉस्पिटलमधून कॉल आला, दीपक सांगवान नावाच्या व्यक्तीने स्वत:ला गोळी मारली आहे, तो गोयल खुर्द येथील रहिवासी आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे पुढील तपासासाठी पीएसआय अरविंद शौकीन यांना पाठवण्यात आले,

डीएसपीने सांगितले की, जेव्हा पोलिसांचा तपास सुरु झाला तेव्हा या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडल्याचं दिसून आलं, तो प्रकाराबाबत जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता, तथ्य तपासण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि चौकशी केली, तेव्हा जखमी युवकाच्या आईने पोलिसांना माहिती दिली, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण केले, घटनास्थळी एक पिस्तुल, दोन कारतूस आणि एक रिकामी कारतूस जप्त करण्यात आली, घटनेशी निगडीत सर्व गोष्टी पोलिसांनी जमा केल्या.

घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्या व्यक्तीने आरोप लावला होता की, रश्मी(नावात बदल) आणि तिचे वडील आनंद दत्त जे महावीर एन्क्लेवमध्ये राहतात, या लोकांनी मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं आहे, मी रश्मीला २ लाख रुपये दिले होते, त्यानंतर मुलीने ती रक्कम चेकद्वारे मला परत केली, परंतु हा चेक बाऊन्स झाला, त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, कोर्टाचे समन्स मिळाल्यानंतर मुलीने आणि तिच्या वडिलांनी मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकचं नाही तर रश्मीने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करत माझ्याविरोधात तक्रार दिली, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं त्यांनी लिहिलं होतं.  

टॅग्स :Policeपोलिस