शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:01 IST

Rape case in vadodara: तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी पार्टी ठेवली होती.

कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. (girl arrange liquor party in her house, friend raped)तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी ओली पार्टी ठेवली होती. दारुच्या नशेत शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. या धक्कात तिने आत्महत्या केली. घटना गुजरातच्या बडोद्याची आहे. बडोद्याच्या लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. बडोद्यामध्ये ती शिक्षणासाठी आली होती आणि भाड्याने राहत होती. तिच्या आईचा 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या सहकाऱ्यांसोबत दारुच्या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तिच्या घरी तिचा मित्र आणि दोन तरुण आले होते. दिशांत कहार आणि नाझिम इस्माईल रहीम मिर्झा अशी त्यांची नावे होती. तरुणीने तिच्या या मित्रांसोबत खूप दारु घेतली आणि ती बेहोश झाली. या तिच्या परिस्थितीचा फायद घेऊन दिशांतने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा दुसऱा दिवस उजाडला तेव्हा तिला शुद्ध आली. तेव्हा तिला आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज आला. तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. तिने लगेचच तिच्या एका जवळच्या मैत्रिणीशी संपर्क केला. तिला घडलेली घटना सांगितली. त्या मैत्रिणीने पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्या तरुणीने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे. एसीपी बकुल चौधरी यांनी सांगितले की, तरुणीचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. अजून त्याचा अहवाल आला नाहीय. मात्र सुरुवातीच्या चौकशीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिशांतला बलात्कार प्रकरणी आणि त्याच्या मित्रांना त्याला मदत केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. तरुणीने तिच्या मैत्रिणीशी केलेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMolestationविनयभंग