३० हजारात गर्भलिंग निदान; ११ हजार डॉक्टरच्या खिशात; वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले

By सोमनाथ खताळ | Published: January 9, 2024 06:10 AM2024-01-09T06:10:03+5:302024-01-09T06:10:48+5:30

घराची झडती, पण हाती काहीच नाही

Gender diagnosis in 30 thousand; 11 thousand in doctor's pocket; Requested call details for the year | ३० हजारात गर्भलिंग निदान; ११ हजार डॉक्टरच्या खिशात; वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले

३० हजारात गर्भलिंग निदान; ११ हजार डॉक्टरच्या खिशात; वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: गेवराईतील गर्भलिंग निदान प्रकरणातील रेट कार्ड समोर आले आहे. यामध्ये एका तपासणीला २५ ते ४० हजार रुपये घेतले जात होते. डमी रुग्णाकडूनही ३० हजार रुपये घेतले. यातील ५ हजार रुपये घरमालक चंद्रकांत चंदनशिव, ११ हजार रुपये डॉ. सतीश गवारे, तर राहिलेले १४ हजार रुपये मनीषा सानप स्वत:कडे ठेवत होती, असे सूत्रांनी सांगितले.  पोलिसांनी मनीषाचे वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. त्यातून संपर्कात कोण कोण हाेते, हे समजणार आहे. गर्भलिंग प्रकरणाचा ५ जानेवारीला पोलिस, आरोग्य विभागाने कारवाई करून पर्दाफाश केला होता.

घराची झडती, पण हाती काहीच नाही

मनीषाचे गेवराई शहरातच ३ मजली टोलेजंग घर आहे. येथे सध्या तिचे नातेवाईक आणि काही भाडेकरू राहतात. कारवाईनंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली.

Web Title: Gender diagnosis in 30 thousand; 11 thousand in doctor's pocket; Requested call details for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.