शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:12 IST

पॉर्न फिल्म प्रॉडक्शन प्रकरण; व्हिडीओ शूट करून वेबसाइटवर करायची अपलोड

मुंबई : चित्रपट, मालिका तसेच वेब सीरीजमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करीत लाखोंची कमाई करणाऱ्या रॅकेटचा मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला. याच अटकसत्रात ‘गंदी बात’ या वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे.मालमत्ता कक्षाने गुरुवारी (दि. ४) मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे छापा टाकला, तेव्हा दिव्यांच्या प्रकाशात अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाचजणांना अटक केली आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यात फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर, दोन अभिनेते आणि कॅमेरामनचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहनाचे स्वतःचे प्रॉडक्शन  हाऊस आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे. या आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली असून, रविवारी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला बुधवार (दि. १०)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गहना ही मॉडेल व अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.