अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:11 AM2021-02-08T05:11:50+5:302021-02-08T05:12:13+5:30

पॉर्न फिल्म प्रॉडक्शन प्रकरण; व्हिडीओ शूट करून वेबसाइटवर करायची अपलोड

Gehana Vasisth arrested for shooting, uploading obscene videos | अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड

अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड

googlenewsNext

मुंबई : चित्रपट, मालिका तसेच वेब सीरीजमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करीत लाखोंची कमाई करणाऱ्या रॅकेटचा मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला. याच अटकसत्रात ‘गंदी बात’ या वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे.

मालमत्ता कक्षाने गुरुवारी (दि. ४) मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे छापा टाकला, तेव्हा दिव्यांच्या प्रकाशात अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाचजणांना अटक केली आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यात फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर, दोन अभिनेते आणि कॅमेरामनचा समावेश आहे. 

या प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहनाचे स्वतःचे प्रॉडक्शन  हाऊस आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे. 

या आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली असून, रविवारी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला बुधवार (दि. १०)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गहना ही मॉडेल व अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.

Web Title: Gehana Vasisth arrested for shooting, uploading obscene videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.