शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक संबंधाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 07:32 IST

गोरेगाव पूर्वेकडील उच्चभ्रू वसाहतीत ३२ वर्षीय तक्रारदार आई-वडिलांसोबत राहतात. ते इंटेरियर आर्किटेक्चर आहेत. ते समलैंगिक असून, सहका-यासोबत ठेवलेले लैंगिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या संमतीने त्यांच्या मोबाइलमध्ये ठेवत असे.

- मनीषा म्हात्रे  मुंबई : समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे एका इंटेरियर आर्किटेक्चरला भलतेच महागात पडले. दुसऱ्या एका समलैंगिक तरुणासोबतच्या संबंधादरम्यान त्याने हेच व्हिडीओ चोरी करून व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढताच तक्रारदारांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.गोरेगाव पूर्वेकडील उच्चभ्रू वसाहतीत ३२ वर्षीय तक्रारदार आई-वडिलांसोबत राहतात. ते इंटेरियर आर्किटेक्चर आहेत. ते समलैंगिक असून, सहका-यासोबत ठेवलेले लैंगिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या संमतीने त्यांच्या मोबाइलमध्ये ठेवत असे. १ जानेवारी रोजी सकाळी ९च्या सुमारास अचानक त्याच्या मित्रांचे कॉल मोबाइलवर येण्यास सुरुवात झाली. त्यात, परदेशातील सहका-यासोबतच्या लैंगिक संबंधाचे व्हिडीओ टिष्ट्वट केल्याची माहिती त्याला मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधित टिष्ट्वटर हँडलर्सला तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत, तो व्हिडीओ कुठून व कसा मिळाला, याबाबत विचारणा केली. त्याच्या मॉरिशसच्या पार्टनरनेही याबाबत चौकशी सुरू केली. तेव्हा अन्य एकाने बनावट युजर आयडीवरून हे व्हिडीओ पाठविल्याचे टिष्ट्वटर हँडलर्सने सांगितले. पुढे हे व्हिडीओ एका ईमेलवर पाठविण्यात आल्याची माहिती मिळताच, संबंधित स्क्रिनशॉट आणि ईमेल आयडीची माहिती मिळाली. याबाबत अधिक माहिती काढताच हा आयडी रोहित रमीत नावाच्या तरुणाचा असल्याचे समोर येताच तक्रारदार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी दिलेल्या माहितीत, सप्टेंबर, २०१९ मध्ये कोलकाता येथे त्यांची रोहितसोबत ओळख झाली. दोघेही एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. याच दरम्यान त्याने त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ पाहिले आणि संधी साधून ते व्हिडीओ चोरी केल्याचा संशय त्यांना आहे. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पोलिसात धाव घेतली नाही. मात्र, पुढे आणखी चार व्हिडीओ अन्य टिष्ट्वटर हँडलर्सवरून प्रसारित झाल्याने मित्रांचे कॉल वाढले. आरोपी रोहितने हे व्हिडीओ ३१ डिसेंबर रोजी संबंधित वापरकर्त्यांना पाठविल्याचे स्पष्ट झाले.तपास सुरू...या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीतेंद्र भावसार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी