शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या मुलाशी झालं होतं गौरीचं लग्न; हत्येनंतर आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:42 IST

आरोपी पतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बंगळुरू येथे नेले जाईल.

बंगळुरू इथं सुटकेसमध्ये ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची तिच्या पतीने हत्या करून पसार झाला होता. त्याला पुण्यात अटक करण्यात आली. मात्र पत्नीच्या हत्येनंतर आता आरोपी पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पतीवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरी खेडेकर असं मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी बंगलुरू एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या. ती मूळची महाराष्ट्रातील रहिवासी होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचा पती राकेश खेडेकर पत्नी गौरीची हत्या करून पुण्याला पळाला होता. तिथे पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हत्येच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरूचं पोलीस पथक पुणे पोलिसांच्या मदतीने या घटनेचा तपास करत आहे. बंगळुरू पोलीस पुण्यात आहेत. आरोपी पतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बंगळुरू येथे नेले जाईल. कौंटुबिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे असं पोलिसांनी म्हटलं.

हत्येनंतर सासू सासऱ्यांना फोन

आरोपी राकेशनं गौरीची हत्या केल्यानंतर त्याच्या सासू सासऱ्यांना फोन केला. फोनवरून मी तुमच्या मुलीला मारून टाकलं असून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये आहे असं सांगितले. जावयाच्या फोननंतर सासू सासरे हादरले. आरोपीने या घटनेची माहिती घर मालकालाही दिली. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घर मालकाने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. जेव्हा पोलिसांनी घरचा दरवाजा उघडला तेव्हा एका ट्रॉली बॅगमध्ये महिलेचा मृतदेह ठेवल्याचं दिसून आले. महिलेच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या. 

दरम्यान, मृत गौरी सांबेकर ही आरोपी राकेशच्या आत्याची मुलगी होती. राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर यांच्या सख्ख्या बहिणीच्या मुलीचं राकेशसोबत लग्न लावले होते. त्यामुळे गौरीची हत्या करणारा तिच्या मामाचा मुलगा होता. पत्नी गौरी रोज त्याच्याशी भांडायची म्हणून मी खून केल्याचं आरोपी राकेशने वडिलांना सांगितले. पत्नी मुलाला त्रास द्यायची, तिच्या आईनेही बऱ्याचदा मुलीला समजावलं. हत्येनंतर राकेशचा मला फोन आला, मी सुद्धा आत्महत्या करणार असल्याचं त्याने फोनवर सांगितल्याची माहिती राजेंद्र खेडेकर यांनी दिली.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी