शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मूक गुन्ह्याला वाचा फोडणारा ‘गौरव’, पोलीस आयुक्तांकडून कौतुक!

By मनीषा म्हात्रे | Updated: August 18, 2024 10:29 IST

तपासणीत बॅगेत मृतदेह निघाल्याने दादर स्थानकात खळबळ उडाली. मात्र, आव्हान पुढे होते. समोरची व्यक्ती कोण?, मृतदेह कुणाचा?, का मारले?, कोणी मारले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून सुरू होती.

गजबजलेल्या पायधुनी परिसरात एका मूक बधिराची दोन मूक बधिरांनी क्रूरपणे हत्या केली. मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने सीएसएमटी स्थानक गाठले. लोकलने दादर स्थानक गाठून कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याची लगबग सुरू झाली. मृतदेह ओढताना झालेली दमछाक पाहून पोलिसांना संशय आला. तपासणीत बॅगेत मृतदेह निघाल्याने दादर स्थानकात खळबळ उडाली. मात्र, आव्हान पुढे होते. समोरची व्यक्ती कोण?, मृतदेह कुणाचा?, का मारले?, कोणी मारले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून सुरू होती. मात्र, आरोपी जय चावडा मूक बधीर असल्याने त्याला पोलिसांची भाषा समजत नव्हती, ना पोलिसांना त्याची.

पोलिसांनी कागदावर प्रश्न लिहून त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबतही तो सहकार्य करत नव्हता.  दुसरीकडे, रात्रीच गुन्ह्याचे गूढ उलगडण्याचे आव्हान यंत्रणेसमोर होते. दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांच्या नेतृत्वात तपास सुरू झाला. रात्री दोन वाजता एक पथक मूक बधिरांची भाषा ओळखणाऱ्याचा शोध घेण्यासाठी साधना कॉलेजच्या दिशेने निघाले.

भोईवाडा पोलिस वसाहतीत राहणारे राजेश सातपुते हे आरएके मार्ग पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा गौरव दादरच्या साधना शाळेत शिकला. दोघांनाही सांकेतिक भाषा अवगत होती. राजेश सातपुते रात्री दोन वाजता नाकाबंदी कारवाईत सहभागी होते. इतक्यात रेल्वे पोलिसांची गाडी तेथे आली. थोड्या वेळापूर्वी दादर स्थानकात मृतदेह भरलेली बॅग वाहून नेणाऱ्या मूक बधीर व्यक्तीस अटक केली. त्याची चौकशी करण्यासाठी दादरच्या साधना शाळेची, सांकेतिक भाषा अवगत असलेल्या व्यक्तीची माहिती शोधत आहोत, असे त्यांनी सांगितले. 

२० तास सलग काम करणारे सातपुते लगेचच पुढे झाले. त्यांनी आपला मुलगा मूक बधीर असून, आम्हा दोघांना सांकेतिक भाषा अवगत आहे, असे सांगत सहकार्य करण्यास तयार झाले. त्यांनी आपला मुलगा गौरव यास उठवून दादर स्थानकातील रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. सातपुते पिता-पुत्राने जय चावडाची चौकशी केली. तपास अधिकाऱ्यांचे प्रश्न सातपुते मुलाला सांकेतिक भाषा करून विचारायचे. पुढे मुलगा जय चावडाकडे याबाबत चौकशी करायचा. जयकडून आलेली उत्तरे वडिलांना सांगून वडील पुढे तपास अधिकाऱ्यांना माहिती देत होते. मृत व्यक्ती अर्शद शेख, आरोपींची नावे, हत्या का, कुठे, कशी झाली? यासोबत अन्य महत्त्वाचे तपशील सातपुते पिता-पुत्राने आरोपीशी संवाद साधत काढून घेतले. 

याच माहितीच्या आधारे पायधुनी पोलीस अन्य आरोपींना वेगाने अटक करू शकले, पुरावे गोळा करू शकले. या सायलेंट किलिंगमागच्या व्हायलेंट स्टोरीचा उलगडा झाला. हत्या करणारा शिवजीत सिंगसह अर्शदच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. हत्याकांडामागे थेट बेल्जियम कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली. तर, सातपुते यांच्या या कर्तव्यनिष्ठेबद्दल संपूर्ण पोलिस दलातून त्यांचे कौतुक सुरू आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील मुंबई पोलिसांचा ‘गौरव’ असे म्हणत त्याचे कौतुक केले. भविष्यात अशा घटनांच्या तपासासाठी मूक बधिरांच्या भाषा अवगत असलेल्याना पोलिसांशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी