शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर संदीप गडोली एन्काऊंटरप्रकरणी हरयाणातून आरोपीला केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 21:35 IST

या प्रकरणात बिंदरचा मागील अनेक दिवसांपासून पोलिस शोध घेत होते.

ठळक मुद्दे बिंदरने पोलिसांच्या मदतीने संदीपचा अंधेरी येथील हाॅटेलमध्ये एन्काऊंटर केला होता. पोलीस हे हरयाणातील गँगस्टर बिंदरच्या मागावर होते.

मुंबई - हरियाणाचा कुख्यात गुंड संदीप गडोली याची पोलिसांच्या मदतीने हत्या घडवून आणणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीहरयाणा येथील गुरुग्राममधून अटक केली  आहे. बिंदर गुर्जर असं या आरोपीचं नाव आहे. आज कोर्टात त्याला हजर केले असता गुर्जरला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिंदर आणि गडोली यांच्यात असलेल्या वादातूनच बिंदरने पोलिसांच्या मदतीने संदीपचा अंधेरी येथील हाॅटेलमध्ये एन्काऊंटर केला होता. या प्रकरणात बिंदरचा मागील अनेक दिवसांपासून पोलिस शोध घेत होते.अंधेरी येथील एका हॅाटेलमध्ये आरोपी संदीप गडोली त्याची मैत्रिण आणि मित्रांसह थांबला होता. दरम्यान,७ फेब्रुवारी २०१६ रोजी हरयाणाच्या गुरुग्राम पोलीस ठाण्याचे आठ पोलीस मुंबईत आले होते. त्यावेळी हरियाणा पोलिसांनी अंधेरी(प.) येथील हॉटेलमध्ये घुसून गडोलीवर गोळ्या झाडल्या होत्या. या बनावट चकमकीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक प्रद्मुमन यादव, दीपककुमार, विक्रम सिंग आणि जितेंद्र यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या सर्वांना हरयाणा पोलिसांनी निलंबीत केले होते. मात्र कॉन्स्टेबल परमजीत अहलावट हा फरार झाला होता. मागील सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान गुरूवारी गुरुग्राम येथे पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत परमजीतला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी संदीपची हत्या ही हरयाणातील एका गँगस्टरच्या सांगण्यावरून केल्याची कबूली दिली.

गडोली हत्या प्रकरणाचा तपास हे गुन्हे शाखा १० चे पोलीस करत होते. पोलीस हे हरयाणातील गँगस्टर बिंदरच्या मागावर होते. मात्र वेळोवेळी बिंदर हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरायचा. हरयाणात नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एका उमेदवाराच्या रॅलीत बिंदर मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी पोलस आता बिंदरची चौकशी करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकHaryanaहरयाणाPoliceपोलिसMumbaiमुंबई