शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:09 IST

Siddhu Moosewala : आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.  

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Siddhu Moosewala) हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान (Police Enquiry) लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की, हो आमच्या गॅंगतील सदस्याने मूसेवालाची हत्या केली. यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला (Death revenge) घेतला. आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.  

तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राच्या प्रकरणात संशयाची सुई गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडे वळली आहे. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात दिल्लीपोलिसांनी तपासाचा फास आवळला असून सोमवारी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली गेली. त्यावेळी दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही. मात्र, आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

'हो माझ्या गॅंगनेच मुसेवालाचा खून केला', तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली

सिद्धू मुसेवालाच्या हत्येत वापरण्यात आलेल्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत. शिवाय, गोळीबार करणाऱ्यांच्या अनेक साथीदारांना अटकही केली, पण तपास पुढे सरकू शकला नाही. उलट आता या प्रकरणात काही नवीन नावे समोर आली आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसPunjabपंजाबcctvसीसीटीव्हीSalman Khanसलमान खानcommissionerआयुक्त