शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार असून देखील शहरात वावरणाऱ्या कुख्यात बिलाल पटेलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 15:28 IST

बिलाल पटेलला चार जिल्ह्यातून २ वर्षांकरिता करण्यात आले तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: चार जिल्ह्यातून २ वर्षां करिता तडीपार केले असताना देखील काशीमीरा भागात वावरणाऱ्या कुख्यात पटेल टोळीतील बिलाल पटेल ह्याला काशिगाव पोलिसांनी अटक केली.  

काशिमीरा भागातील पटेल टोळीची दहशत व गुन्हेगारी कारवाया पाहता पोलिसांनी त्यांच्यावर तडिपारीच्या कारवाया केल्या आहेत. पटेल टोळीतील कुख्यात बिलाल गुलामरसूल पटेल ( वय ४९ वर्ष ) रा . काशिगाव ह्याला मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशा नुसार ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.

तडीपार असताना देखील पटेल हा काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत होता . काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी तडीपार व्यक्ती आढळून आल्यास अटक करण्याचे निर्देश दिले होते . माशाचा पाडा मार्गावर ईद निमित्त  पोलीस उपनिरीक्षक अभंजित लांडे व उपनिरीक्षक किरण  बगडाणे सह अंमलदार किरण विरकर , धीरज राणे , राहुल वाळुंज , प्रवीण टोबरे  हे गुरुवारी रात्री गस्त घालत होते. 

पोलिसांच्या पथकाला पाहून एकजण रात्रीच्या वेळी लपण्याच्या प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पथकाने त्याला अडवून ताब्यात घेतले असता तो तडीपार असलेला कुख्यात बिलाल पटेल असल्याचे निष्पन्न झाले . त्याच्यावर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली गेली . शुक्रवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करत तडीपार काळात त्याने दिलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणीकंद या ठिकाणी जाण्याचे आदेश बजावले . 

माशाचा पाडा मार्गावर गौरशाह बाबा ट्रस्टची जमीन असून त्या ठिकाणी ईद निमित्त मोठ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी बिलाल याने जागा भाड्याने दिली होती . परंतु त्याला विरोध झाल्यावर ती परवानगी रद्द केली गेली . ह्या घटने मुळे बिलाल हा काशिगाव भागातच बेकायदा वावरत असल्याचे उघडकीस आले होते .

टॅग्स :mira roadमीरा रोडArrestअटक