शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधील कासुर्डीत तरूणीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:31 IST

ऊसाच्या गु-हाळावर काम करणा-या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

यवत : ऊसाच्या गु-हाळावर काम करणा-या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे ऑक्टोबरपासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांकडे तक्रार द्यायला आलेल्या पिडीत मुलीच्या वडीलांचा मानसिक तणाव आल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी नदीम या परप्रांतीय ठेकेदारासह त्याच्या मोहसीन व दिलवाज या दोन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील गु-हाळावर पिडीत तरूणी व तीचे कुटुंबीय मजूर म्हणून काम करत होते. या गु-हाळाचा ठेकेदार ‘नदीम’ याने पिडीतेला (दि. १०) आक्टोबर रोजी कासुर्डी गावच्या हद्दीतील एका शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (पूर्ण नावे माहीत नाहीत. तिघे रा. उत्तराखंड) या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार समजल्यावर पिडीतेच्या वडिलांनी संबंधितांना जाब विचारला. मात्र, आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच काही दिवस डांबून ठेवले. आरोपींनी त्यानंतर दि. १७  आक्टोबर रोजी सात हजार पाचशे रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणा-या रेल्वेमध्ये बसवून दिले आणि कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र. संबधित पिडीतेने आपल्या गावी गेल्यावर कुटुंबीयांसोबत जाऊन गंगाहर पोलीस स्टेशन (ता. रूडकी, जि. हरिद्वार, राज्य उत्तराखंड) येथे संबंधितांविरूद्ध फिर्याद दिली. शून्य क्रमांकाने ही फिर्याद यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून तपास करत यवत पोलिसांनी मोहसीन व दिलवाज यांना अटक केली आहे. दरम्यान,  काल पिडीता व तीचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या वडीलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलीस ठाण्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार