शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टोळी पुन्हा सक्रीय :महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह मोबाइलही खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:25 IST

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.

ठळक मुद्देसलग तीन दिवसांपासून घटनाजबरी लुटीत ८५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पोबारा

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी चोरांची टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. मागील तीन दिवसांपासून सलग शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडू लागल्याने संताप व्यक्त होत आहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेजरोड येथील शिर्के मळ्यात एका महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी व हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी जोत्सना गोविंद जंगले (६०,रा.प्रभुप्रसाद अपार्टमेंट, शिर्केमळा) या त्यांच्या राहत्या घराजवळ चारचाकी वाहन उभे करण्यासाठी गेले असता अपार्टमेंटपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना भरधाव दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी या जबरी लुटीत ८५ हजारांची सोनसाखळी व ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा एकूण ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.नववर्षात पुन्हा पोलिसांपुढे आव्हानसोनसाखळी चोरी करणारी टोळी नववर्षात पुन्हा शहरात सक्रीय होऊ लागली असून शहर पोलिसांपुढे या टोळीला बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आडगाव, मुंबईनाका आणि आता गंगापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच दिवसांत लागोपाठ घटना घडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरी