शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारप्रकरण : अल्पवयीन आरोपींच्या जामिनाला आव्हान, 17 मार्चला होणार पुढील सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 21:06 IST

Gangrape Case : आज न्यायालयात सुनावणी होऊन निर्णय अपेक्षित होता. परंतू न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.

डोंबिवली: सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार अल्पवयीन आरोपींची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. परंतू या निर्णयाला पिडीताने आव्हान दिले आहे. जामिन अर्ज रद्द करण्याची मागणी तीने ठाणे  जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. त्याबाबत आज न्यायालयात सुनावणी होऊन निर्णय अपेक्षित होता. परंतू न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.

15 वर्षाच्या मुलीवर तब्बल 33 नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. या गुन्हयाचे दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात मानपाडा पोलिसांकडून सादर झाले आहे. दरम्यान या गुन्हयातील चार अल्पवयीन आरोपींची यापुर्वीच भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. अल्पवयीन आरोपींचे दोषारोपपत्र 30  दिवसात दाखल होणो गरजेचे असते परंतू मानपाडा पोलिसांकडून ते सादर करायला दिड महिना लागल्याने दोघा अल्पवयीन आरोपींना जामिन मंजूर झाला तर अन्य दोघांना आरोप पत्रनंतर जामिन मंजूर करण्यात आला. दरम्यान चौघांना जामिन देण्याच्या भिवंडी बाल न्यायालयाच्या निर्णयाला पिडीताच्या वतीने डिसेंबर महिन्यात ठाणे येथील न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान शुक्रवारी यावर सुनावणी होती परंतू न्यायालयाने सुनावणी 17 मार्चला होईल असे स्पष्ट झाले.दरम्यान या गुन्हयातील अन्य चार आरोपींनी  कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.  त्या अर्जावर १६ फेब्रुवारीला बुधवारी सुनावणी आहे. या गुन्हयाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यावर डिसेंबर महिन्यातच संबंधित आरोपींनी जामिन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. 22 डिसेंबरला पहिली सुनावणी झाली होती. दरम्यान पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड योगेंद्र पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. चौघांच्या जामिन अर्जावर निर्णय काय दिला जातो याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसCourtन्यायालय