शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारातील आरोपीला मारहाण; मध्यस्थी मित्राची गोळी घालून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:42 IST

सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांची मारामारी सोडविण्यास गेलेल्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

ठळक मुद्दे सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांनी त्या तरुणाला गोळ्या घालून ठार केले.कुंदन चौधरी असं मृत तरुणाचे नाव असून सरमेरा गावचे रहिवासी असेलेल्या अशोक चौधरी यांचा २२ वर्षांचा कुंदन हा मुलगा आहे.

सामूहिक बलात्काराच्या आरोपीला रस्त्यावरच दुसऱ्या आरोपीने मारहाण केली आणि वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राला गोळ्या घालून ठार केले. सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांची मारामारी सोडविण्यास गेलेल्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांनी त्या तरुणाला गोळ्या घालून ठार केले. हा गुन्हा केल्यावर गुन्हेगार फरार झाले. दोघेजण सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला रस्त्यावर मारहाण करीत होते. आरोपीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तो यात मृत्युमुखी पावला. कुंदन चौधरी असं मृत तरुणाचे नाव असून सरमेरा गावचे रहिवासी असेलेल्या अशोक चौधरी यांचा २२ वर्षांचा कुंदन हा मुलगा आहे. या गोळीबारात बलात्काराचा आरोपी विकास कुमार जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून  खळबळ उडाली आहे. स्टेशन प्रमुख पोलीस पथकासह घटनास्थळी आले. पोलिसांनी मृत आणि जखमीस सदर रुग्णालयात दाखल केले. 

रुग्णालयाने गोळीबारात जखमी झालेल्या कुंदनला मृत घोषित केले. सामूहिक बलात्काराच्या वादात ही घटना घडल्याची चर्चा आहे. तसा पोलिसांना देखील संशय आहे. मात्र, मृत तरुणाचा सामूहिक बलात्काराशी काही संबंध नव्हता. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिला. या युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर डीएसपी इम्रान परवेझ यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कुंदनला घरातून खांडा येथे जाण्यास सांगितले निघाला होता. विकास सुद्धा त्याच्यासमवेत खंदाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी काही नराधमांनी विकासला घेरले आणि मारहाण करण्यास सुरवात केली.

कुंदन विकासला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी, गुंडांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुंदन जखमी झाला. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. पोलिसांनी दोन्ही जखमींना सदर रुग्णालयात उपचारासाठी नेले. जेथे डॉक्टरांनी कुंदनला मृत घोषित केले. १७ जून २०१८ रोजी सरमेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरात चार नराधमांनी एका पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी विकास, अरविंद चौधरी, डहन आणि बबलू यांना अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबारMurderखूनGang Rapeसामूहिक बलात्कार