शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारच्या टोळीला केले तीन जिल्ह्यातून हद्दपार, लातूर पोलिसाचा गुन्हेगारांना दणका

By राजकुमार जोंधळे | Updated: October 18, 2023 20:49 IST

औसा तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या टोळीला धक्का

राजकुमार जोंधळे, लातूर: औसा तालुक्यात अवैध दारूविक्री करणारी सराईत गुन्हेगाराच्या टोळीला लातूरसह सोलापूर, धाराशिव या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बुधवारी जारी केले आहेत. लातूर जिल्ह्यातील भाईगिरी, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना त्रास देत वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या गुंडांच्या टोळीला अद्दल घडविणयासाठी पोलिस अधीक्षक मुंडे यांनी आजपर्यंत हद्दपारीच्या एकूण चार प्रकरणात १२ सराईत गुन्हेगारांविरोधात करवाई केली असून, त्यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

टोळीतील गुन्हेगारांवर सहा गंभीर गुन्हे दाखल

या गुन्हेगारांच्या टोळीचे रेकॉर्ड पाहता भादा पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द फौजदारीपात्र अपराध करणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून अवैध दारू विक्री करणे, दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख संदीप दिलीप गरड (वय ३५), प्रवीण दिलीप गरड, (वय २२, दोघेही रा. बिरवली ता. औसा जि. लातूर) याच्याविरुद्ध हद्दपारिचे आदेश जारी केले आहेत. 

लातूरसह तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी टोळी हद्दपार...

औसा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.हा प्रस्ताव तयार करण्यासाठी औसा उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अंमलदार प्रदीप स्वामी, भादाचे सपोनि. डोंगरे, अमलदार देशमुख, फड यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :laturलातूर