शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद, पालघरमधील बनावट कारखाना उद्ध्वस्त, भायखळा गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:08 IST

निवडणूक काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. 

पालघर/वाडा : वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतामध्ये नीरज वेखंडे या तरुणाच्या सहाय्याने भायखळा, मुंब्रा येथील तरुणांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. गेल्या सात महिन्यांपासून लाखो रुपयांच्या बनावट नोटा बनविणारा हा कारखाना भायखळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी शनिवारी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली. टोळीचा मुख्य सूत्रधार फरार आहे. उमरान उर्फ असिफ बलवले (वय ४८, रा. मुंब्रा), यासीन युनूस शेख (४२), भीम बडेला (४५, दोन्ही रा. भायखळा) आणि स्थानिक नीरज वेखंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

५०० रुपयांचा २०० बनावट नोटाटोळीतील काही जण दुचाकीवरून भायखळा येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. भायखळा येथे तीन व्यक्ती आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा त्यांच्याकडे आढळल्या. 

मुख्य आरोपी सुटला होता जामिनावर फरार मुख्य आरोपी एका गुन्ह्यात जामिनावर  सुटला होता.  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने नीरजच्या मदतीने बनावट नोटा बनवण्याचे नियोजन केले. त्यासाठी वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतात पत्र्याचे शेड बांधले. तेथे फरार आरोपी आणि नीरज दिवसभर बनावट नोटा तयार करत होते. बनावट नोटा ओळखण्याचे मशीनही त्यांच्याकडे होते. मशीनवर नोटा तपासूनच त्या विक्रीसाठी पुढे देत असत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी