शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नेता चालवित होता दारू तस्करांची टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:10 IST

नेत्याच्या इशाऱ्यावर संचालित होत असलेली दारू तस्करांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बजाजनगर पोलिसांनी या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. नेता आणि दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देदोन साथीदारांना अटक : दारू व्यावसायिकांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नेत्याच्या इशाऱ्यावर संचालित होत असलेली दारू तस्करांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बजाजनगर पोलिसांनी या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. नेता आणि दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध सुरु आहे.अटक केलेल्या आरोपीत महेश भोजराज इखार (४३) रा. साईबाबानगर आणि राहुल टिकारामसिंह बैस (२६) रा. त्रिमूर्तीनगर यांचा समावेश आहे. त्यांचा प्रमुख समित रहांगडाले फरार आहे. महेश ऑटोचालक आहे, तर राहुल पोओपीचे काम करतो. ते अमित रहांगडालेच्या इशाऱ्यावर दारूची तस्करी करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित एका राष्ट्रीय पार्टीच्या युवा शाखेचा पदाधिकारी आहे. त्याच्या इशाऱ्यावर दोघेही दारूची तस्करी करीत होते. ते ऑटोत दारू भरून वर्धा मार्गावर घेऊन जातात. तेथून अमित रहांगडाले ही दारू बाहेर रवाना करतो. अनेक दिवसांपासून हे काम सुरु आहे. त्याची पोलिसांना माहिती मिळाली. बजाजनगर पोलिसांनी सावरकरनगर चौकाजवळ महेशच्या सहा सिटर ऑटोला थांबविले. त्यात राहुलही होता. ऑटोची तपासणी केली असता त्यात दारूच्या पेट्या होत्या. त्यांची किंमत ७२ हजार रुपये होती. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही अमित रहांगडालेच्या इशाºयावर रजत वाईन शॉपमधून दारूच्या पेट्या आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दारू आणि ऑटो जप्त केला आहे. रजत वाईन शॉप अत्रे ले-आऊटमध्ये आहे. त्याचा मालक राजू प्यारेलाल जायसवाल असून तो प्रभावशाली आहे. अमितही राष्ट्रीय पार्टीचा शहर युवा पदाधिकारी आहे. यामुळे कारवाईची माहिती मिळताच नेता सक्रिय झाले. त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आरोपींना जमानतीवर सोडण्यास सांगितले. बजाजनगर पोलिसांनी नेत्यांचे ऐकले नाही. त्यांनी आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस दारू व्यावसायिक राजू जायसवाल आणि त्याचे दुकान चालविणाऱ्यांचा तपास करीत आहेत. त्यानंतर दोघांची भूमिका ठरविण्यात येणार आहे. सूत्रांनुसार राष्ट्रीय पार्टीचा पदाधिकारी असल्यामुळे अमित रहांगडालेवर कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहत आहेत. त्याचे मोठ्या व्यक्तींसोबत संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे बजाजनगर पोलिसांनी योजना आखून ही कारवाई केली. ही कारवाई ठाणेदार राघवेंद्रसिंह क्षीरसागर, हवालदार संजय सिंह ठाकुर, विनोद द्विवेदी, संजू भूषणम, अनिल टिक्कस यांनी पार पाडली.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करी